वाकोदसह परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे पिके आडवी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2020 22:35 IST2020-09-07T22:35:05+5:302020-09-07T22:35:12+5:30
नुकसान : आर्थिक मदत मिळण्याची शासनाकडे मागणी

वाकोदसह परिसरात झालेल्या वादळी पावसामुळे पिके आडवी
वाकोद, ता. जामनेर : येथे आणि परिसरात रविवार रोजी मुसळधार वादळी पावसाने झोडपल्याने शेतकरी वर्गाचे मोठे नुकसान झाले असून मुसळधार पावसामुळे शेतातील उभी पिके आडवी पडली आहेत. यामुळे शेतकरी वर्ग मोठया अडचणीत सापडला आहे.
यामध्ये वाकोद येथील शेतकरी शेख गफ्फार शेख हनीफ यांच्या शेतात लावलेला सुमारे साडेतीन एकर ऊस वादळी पावसाने भुईसपाट झाला आहे. मेहनतीने गेल्या अनेक महिण्यापासून ऊस पिकाचा ते सांभाळ करीत होते. काही दिवसात माल हाती लागणार असतांना वादळी पावसामुळे ऊसाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे या शेतकऱ्याला आर्थिक फटका बसला असून पंचनामे करून मदतीची मागणी होत आहे.