शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 21, 2021 00:28 IST

जिल्हाभरात वादळी वाऱ्याने पिके आडवी झाल्याने शेतकरी हताश झाला आहे.

जळगाव : जिल्हाभरात शनिवारी सायंकाळी पडलेल्या पावसाने दाणादाण उडाली. अनेक ठिकाणी गारपीटही झाली. शेतीचा हातातोंडाशी आलेला घास या अवकाळी पावसाने हिरावून नेला त्यामुळे शेतकरी पुन्हा चिंताग्रस्त झाला आहे.आडगाव येथे वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊसआडगाव, ता. चाळीसगाव : शनिवारी सायंकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस सुरू झाला. साधारणतः सुपारीच्या आकासारखी गार पडली. यावेळी पाऊसही जोरात होता. पावसाने शेतात कापून ठेवलेला गहु, हरभरा झाकण्यासाठी एकच तारांबळ उडाली. बहुतेक शेतकऱ्यांनी मक्याचे कणसे मोडून व चारा कापून ठेवल्याने कणीस ओले झाले व चाराही ओला झाला. ज्वारी, बाजरीच्या कणसांना दाणे नसल्याने त्याच्या पंचनाम्यासाठी कृषी अधिकाऱ्यांकडे चकरा माराव्या लागत आहे. अवकाळीमुळे नुकसान झालेल्या पिकांच्या पंचनाम्यासाठी पुन्हा कृषी विभागाचे दार ठोठवावे लागेल की काय, असा प्रश्न शेतकऱ्याला पडू लागला आहे.जामनेरात गारपीट जामनेर : तालुक्यातील तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी परिसरात शनिवारी दुपारी चार वाजेच्या सुमारास गारपिटीसह पाऊस झाला. गारपिटीमुळे शेतातील हरभरा, मका व ज्वारीच्या पिकांचे नुकसान झाल्याची माहिती आहे. जोरदार वाऱ्यासह वादळाने सुरुवात होत काही भागात पावसाबरोबर गारादेखील पडल्या. तोंडापूर, मोयगाव, भागदारा, टाकळी या भागात दुपारी जोरदार वारा वाहू लागला. पावसाला सुरूवात होताच टपोऱ्या गारा पडायला सुरुवात झाली.चाळीसगाव परिसराला अवकाळीने झोडपलेलोकमत न्यूज नेटवर्कचाळीसगाव : शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता अवकाळी पावसाने चाळीसगाव परिसराला चांगलेच झोडपून काढले. गारपिटीचा माराही झाला. या अवकाळी धूमशानामुळे रब्बी पिकांचे मोठे नुकसान झाल्याची शक्यता शेतकऱ्यांमधून व्यक्त केली जात आहे.शनिवारी सकाळपासूनच वातावरण काहीसे ढगाळ होते. दुपारी उकाडाही वाढला होता. दुपारी साडेचार वाजता ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पावसाला सुरुवात झाली. विजेच्या कडकडाटात जोराचा वारा आणि वादळी पावसाने सर्वत्र एकच धावपळ उडाली. गोटीच्या आकाराची गारपीटही झाली.  वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे रस्त्यावरील काही झाडे पडली, फांद्याही पडून आल्या. अनेक ठिकाणी तुंबलेल्या गटारींचे पाणी रस्त्यावर आले होते.रावेरसह अनेक तालुक्यात वादळी पावसाचे तांडवरावेर : शहरासह तालुक्यात सायंकाळी पावणेसात वाजेपासून आभाळ भरून आल्याने विजांच्या कडकडाटात वादळी पावसाने तांडव घातल्याने ऐन कापणीवरील केळीबागा, मळणीसाठी कापून पडलेली वा उभी गहू, हरभरा, मक्याच्या उत्पादनाची वादळ-पावसात धूळधाण होऊन अपरिमित हानी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान, वादळी पावसात वीजपुरवठा खंडित झाल्याने तालुका अंधारात बुडाला आहे.

टॅग्स :RainपाऊसJalgaonजळगाव