पारोळा तालुक्याची पीक आणेवारी कमी लावावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:20 IST2021-09-17T04:20:12+5:302021-09-17T04:20:12+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पारोळा : तालुक्यात पीक आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे. ...

The crop of Parola taluka should be reduced in Aanewari | पारोळा तालुक्याची पीक आणेवारी कमी लावावी

पारोळा तालुक्याची पीक आणेवारी कमी लावावी

लोकमत न्यूज नेटवर्क

पारोळा : तालुक्यात पीक आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने केली आहे.

जिल्हाध्यक्ष वाल्मीक पाटील यांनी तहसीलदार अनिल गवांदे यांना निवेदन दिले. त्यात म्हटले आहे की, एक महिन्यापासून सततच्या पावसामुळे कापूस पिकाची वाईट अवस्था झाली. परिणामी कापूस लाल पडला. लाल्या व दह्या रोगाचा प्रादुर्भाव झाला. झाडे कोमेजून कापसाच्या कैऱ्या सडल्या. कैऱ्यांमधून दुर्गंधी येत आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान यात झाले. शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आलेली आहे. तरी शासनाने शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी व तत्काळ सरसकट पंचनामे करून पीकविमा व नुकसानभरपाई द्यावी. तालुक्याची आणेवारी ५० पैशांच्या आत लावावी.

यावेळी संघटनेचे सुरेश पाटील, घनश्याम पाटील, नाना पवार, जितेंद्र पाटील, राहुल पाटील, रणजीत पाटील व कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: The crop of Parola taluka should be reduced in Aanewari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.