शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 25, 2019 22:47 IST2019-06-25T22:46:00+5:302019-06-25T22:47:52+5:30
अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित ...

शेतकऱ्यांसाठी पीक विमा मदत केंद्र
अमळनेर, पारोळा : या शहरांमध्ये तालुका शिवसेनेतर्फे शेतक-यांसाठी पीक विमा मदत केंद्र सुरू करण्यात आले आहे. पीक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना विमा मिळवून देण्यासाठी, तसेच त्यांच्या शंकांचे निरसण करण्यासाठी या केंद्रांची निर्मिती करण्यात आली आहे.
अमळनेर शिवसेनेतर्फे शहरातील निकुंभ कॉम्प्लेक्स, व्यंकटेश अॅग्रो शॉपजवळ फॉर्म मदत स्टॉल उभारून भरून घेण्याचे काम २५ रोजी सुरू होते.पारोळा येथे शिवसेनेतर्फे शेतकरी पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन
पारोळा : येथील शेतकरी संघात पीक विमा मदत केंद्राचे उद्घाटन बाजार समिती सभापती, जिल्हा बँकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तालुकाप्रमुख आर. बी. पाटील, चतुर भाऊसाहेब पाटील, जिजाबराव बापू पाटील, दिलीप पाटील, मधुकर पाटील, भिकन महाजन, शहरप्रमुख अशोक भाऊ मराठे, पी. के. पाटील, राजू कासार आदी उपस्थित होते.