शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘त्या’ गुन्हेगारांनी मालेगावात कापूस व्यापाऱ्याचेही २० लाख लुटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 16:41 IST

पिस्तूलचा धाक दाखवून जळगाव शहरातून १५ लाख रुपये लुटणाऱ्या खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (२२,रा.मोहाडी, धुळे) व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१८९, रा.पवन नगर, धुळे) या दोघांनी ५ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव तालुक्यात सायन बु.,ता.मालेगाव येथे सुनील श्रावण चौधरी (४४,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या कापूस व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून २० लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देआणखी एकास अटकदोन्ही गुन्ह्यातील २० लाख ६१ हजाराची रोकड हस्तगत

जळगाव : पिस्तूलचा धाक दाखवून जळगाव शहरातून १५ लाख रुपये लुटणाऱ्या खुशाल उर्फ मनोज अशोक मोकळ (२२,रा.मोहाडी, धुळे) व रितीक उर्फ दादू राजेंद्र राजपूत (१८९, रा.पवन नगर, धुळे) या दोघांनी ५ डिसेंबर २०२० रोजी मालेगाव तालुक्यात सायन बु.,ता.मालेगाव येथे सुनील श्रावण चौधरी (४४,रा.लोंढे, ता.चाळीसगाव) या कापूस व्यापाऱ्याला पिस्तूलचा धाक दाखवून २० लाख रुपये लुटल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. हा गुन्हाही एमआयडीसी पोलिसांनी उघडकीस आणला असून त्यात अविनाश सुरेश माने (१९,रा.दगडी चाळ, धुळे) याला अटक करण्यात आली आहे. जळगाव व मालेगावात दाखल असलेल्या दोन्ही गुन्ह्यात २० लाख ६१ हजार रुपये हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले आहे. पंचमुखी हनुमान मंदिराच्या परिसरात १ मार्च रोजी महेश चंद्रमोहन भावसार व संजय विभांडीक यांना पिस्तूलचा धाक दाखवून दोघांनी १५ लाख रुपये लांबविल्याची घटना घडली होती. सहायक फौजदार आनंदसिंग पाटील यांनी घटनास्थळी पडलेली गुन्हेगारांची दुचाकी शोरुममध्ये नेऊन मालक निष्पन्न केला होता. त्यानंतर अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी, पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे, तपासाधिकारी विशाल सोनवणे, सहायक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, सचिन मुंढे, इम्रान सय्यद, मिलिंद सोनवणे, सुधीर साळवे, संदीप पाटील, हेमंत कळसकर व सचिन पाटील यांच्या पथकाने अथक परिश्रम घेऊन खुशाल व रितीक या दोघांना निष्पन्न केले. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखा व एमआयडीसी पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दोघांच्या उल्हासनगरातून मुसक्या आवळल्या. दोघांकडून धुळे, उल्हासनगर व सुरत येथून तीन टप्प्यात १३ लाख ३१ हजार रुपये हस्तगत करण्यात यश आले. या गुन्ह्यातील अजून १ लाख ६९ हजार रुपये हस्तगत होण्याचे बाकी आहे.

एकाच्या तपासात दुसरा गुन्हा उघडया गुन्ह्याचा तपास करीत असतानाच एमआयडीसी पोलिसांनी दोघांना खाकी हिसका दाखविला असता त्यांनी डिसेंबर २०२० मध्ये मालेगाव शहराच्या बाहेर चाळीसगाव रत्यावर कापूस व्यापाऱ्याचे अशाचे पध्दतीने २० लाख रुपये लुटल्याची कबुली देतानाच त्याच आणखी एकाचा समावेश असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने तिसरा साथीदार अविनाश माने याला ताब्यात घेतले. त्याशिवाय ७ लाख ३० हजाराची रक्कमही हस्तगत करण्यात यश आले. ही रोकड व तिसरा आरोपी मालेगाव तालुका पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव