विनयभंग प्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2019 21:17 IST2019-10-26T21:17:17+5:302019-10-26T21:17:44+5:30
चाळीसगाव : दूधसागर मार्गावरील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.एम.बी.परदेशी यांच्याविरुद्ध तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला. २५ रोजी सायंकाळी ७.३० ...

विनयभंग प्रकरणी डॉक्टरविरुद्ध गुन्हा
चाळीसगाव : दूधसागर मार्गावरील श्री सिद्धिविनायक हॉस्पिटलचे डॉ.एम.बी.परदेशी यांच्याविरुद्ध तरुणीचा विनयभंग प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
२५ रोजी सायंकाळी ७.३० ते ७.४५ दरम्यान एका २३ वर्षीय तरुणीवर आयसीयू कक्षात उपचार सुरू असताना डॉ.एम.बी.परदेशी यांनी दरवाजा बंद करून उपचार करतो, असे सांगून तिचा विनयभंग केला. तरुणीच्या फिर्यादीवरून चाळीसगाव शहर पोलिसात डॉ.परदेशीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल बापूराव भोसले करीत आहेत.