Crime News : जळगावातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथील एका गावात एक ३५ वर्षीय महिला आपल्या लहान मुलासह रात्रीच्यावेळी एका रोडने चालत जात होती. यावेळी तिथे तिघांनी या महिलेला अडवले आणि तुम्हाला आम्ही घरी सोडतो असं सांगितले. या तिघांनी त्या महिलेला जंगलात नेऊन महिलेवर सामुहिक अत्याचार केला.
Crime News : पत्नी पतीसमोर प्रियकरासोबत शारीरिक संबंध ठेवायची; नाराज पतीने उचलले टोकाचे पाऊल
मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय पीडित महिला घटनेच्या दिवशी २० तारखेला आपल्या मुलासह मावशीला भेटायला गेली होती. पण तिला पुन्हा आपल्या घरी येण्यास उशीर झाला. यावेळी पीडितेच्या मावशी एका कारमधून महिलेला घरी पाठवलं. संबंधित लोक तुला घरी सोडतील, असंही मावशीने सांगितलं. पण काही अंतर दूर गेल्यानंतर आरोपींची नियत बदलली. ते तिला जंगलात घेऊन गेले. जंगलात घेऊन जाऊन सामुहिक अत्याचार केले.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दशरथ गोरेलाल भिलाले, कुंदन गोरेलाल भिलाने आणि शंकर भगवानसिंग भिलाले (तिघेही रा. भुसावळ) यांनी तिला घरी सोडण्याचा बहाणा केला आणि कारमधून जंगलात घेऊन गेले. तिथे तिघांनी मिळून तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. हा प्रकार घडल्यानंतर पीडित महिलेने थेट भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.
पोलिसांची तात्काळ कारवाई
तक्रारीनंतर पोलिसांनी लगेच कारवाई केली. पीडितेच्या तक्रारीवरून पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू आहे.
या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीस ठाण्यात तिन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश देशमुख करत असून, लवकरच फरार आरोपीलाही अटक करण्यात येईल,असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.