वाईनशॉप मालकाकडून खंडणी मागितल्याने गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 22:19 IST2020-06-11T22:19:16+5:302020-06-11T22:19:58+5:30

चाळीसगावची घटना : फोन करुन दिला त्रास

Crime for demanding ransom from a wine shop owner | वाईनशॉप मालकाकडून खंडणी मागितल्याने गुन्हा

वाईनशॉप मालकाकडून खंडणी मागितल्याने गुन्हा

चाळीसगाव : वाईनशॉप मालकाकडून खंडणीची मागणी केली म्हणून राकेश निकम या इसमाविरुद्ध चाळीसगाव शहर पोलीसात खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे.
वृत्त असे की, भडगावरोडवरील ओरिजनल बियर आणि वाईन शॉप या दुकानात येवून राकेश निकम याने १० रोजी दुपारी साडेचार वाजता बियर शॉपचा चोरून काढलेला एक मिनिट पन्नास सेकंदाचा व्हिडिओ दुकान मालक उदय पवार यांच्या व्हॉट्सअप मोबाईल क्रमांकावर टाकला. यामागे पैसे उकळण्याचा त्याचा हेतू असल्याने दुकान मालक पवार यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यानंतर राकेश निकम याने भ्रमणध्वनीवरून पवार यांना विचारले की,तुमच्याकडे बियर व वाईन शॉपचे लायसन्स असल्यामुळे तुम्हाला रम किंवा विस्की विकण्याचा कुठलाही अधिकार नाही, असे असतांना तुम्ही ७० लाखाचे ५ कोटी रुपये केले यावर तुमचे म्हणणे काय ? अशी विचारणा केली. याकडेही पवार यांनी दुर्लक्ष केले म्हणून त्याने पुन्हा १० रोजी रात्री साडे दहा वाजता बंद दुकानाचे फोटो काढले व भ्रमणध्वनी वरून तुमची दारू बंदी विभागाकडे तक्रार करून चौकशीचा ससेमिरा लावतो असे सांगून पैश्याची मागणी केली.
दुकान मालक उदय पवार यांनी ११ रोजी शहर पोलीसात त्याचेविरुद्ध दिलेल्या फियार्दीवरून राकेश निकम याचे विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मयूर भामरे करीत आहे.

Web Title: Crime for demanding ransom from a wine shop owner