चाळीसगावातील मैत्रेयच्या गाळ्यांची गुन्हे शाखेने खरेदी-विक्री थांबविली

By Admin | Updated: April 24, 2017 18:05 IST2017-04-24T18:05:34+5:302017-04-24T18:05:34+5:30

मैत्रेय कंपनीच्या चाळीसगाव येथील गाळ्यांवर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे.

The crime branch of Chalisgaon stopped selling and selling of crime branch | चाळीसगावातील मैत्रेयच्या गाळ्यांची गुन्हे शाखेने खरेदी-विक्री थांबविली

चाळीसगावातील मैत्रेयच्या गाळ्यांची गुन्हे शाखेने खरेदी-विक्री थांबविली

 चाळीसगाव,दि.24- ठेवीदारांचे पैसे अडकून पडल्याने कायदेशीर कारवाईच्या कचाटय़ात सापडलेल्या मैत्रेय कंपनीच्या चाळीसगाव येथील गाळ्यांवर मुंबईच्या आर्थिक गुन्हे शाखेने टाच आणली आहे. येथील गणेश व्यापारी संकुलात मैत्रेयच्या मालकीचे दोन कार्यालय आहेत. काही महिन्यांपासून ते बंद पडले आहे. मैत्रेयची मालमत्ता तपासणी साठी मुंबई आर्थिक गुन्हे शाखेचे पथक सोमवारी दुपारी चाळीसगावात आले होते. त्यांनी मैत्रेयच्या मालमत्तेची पाहणी केली व त्यावर नोटीस लावली आहे. त्यानुसार कायदेशीर प्रक्रिया पूर्ण होईर्पयत ही मालमत्ता कोणासही खरेदी - विक्री करता येणार नाही. तसेच मालमत्ता भाडय़ाने देखील देता येणार नसल्याचे नोटीसमध्ये म्हटले आहे.

Web Title: The crime branch of Chalisgaon stopped selling and selling of crime branch