भुसावळला उघडय़ावर शौचास बसणा:या चौघांविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: April 7, 2017 17:48 IST2017-04-07T17:48:23+5:302017-04-07T17:48:23+5:30
पहाटे काही नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़

भुसावळला उघडय़ावर शौचास बसणा:या चौघांविरुद्ध गुन्हा
भुसावळ, जि. जळगाव, दि. 7- शहर हगणदरीमुक्तची घोषणा झाल्यानंतरही शहरातील अनेक भागात भल्या पहाटे काही नागरिक उघडय़ावर शौचास बसत असल्याने पालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने शुक्रवारी कारवाई करीत चौघांना ताब्यात घेऊन शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़
पालिकेने प्रथमच धडक कारवाई केल्याने स्वागत होत आहे.
यावल रोडवरील राहुल नगर भागात शुक्रवारी पहाटे उघडय़ावर शौचास बसणा:या चौघांना पालिकेच्या गुड मॉर्निग पथकाने ताब्यात घेत त्यांच्याविरुद्ध शहर पोलिसात गुन्हा दाखल केला़
यांचा कारवाईत सहभाग
पालिकेचे मुख्याधिकारी बी़टी़ बाविस्कर यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभारी आरोग्याधिकारी अशोक फालक, आरोग्य अधिकारी दिलीप इंगळे, व्ही़सी़राठोड, सरोज झाल्टे, चंद्रकांत पाटील, अर्चना महाजन, विनय पगारे, लता गवारे, चंदू येवले, रमेश गुंजाळ, युवराज नरवाडे, नंदू भावसार, विजय जठार, शाम सोनवणे, जगदीश फालक, रफिक श़ेयाकूब यांच्या पथकाने ही कारवाई केली़