घराचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:13 IST2021-06-26T04:13:22+5:302021-06-26T04:13:22+5:30

जळगाव : घर तारण ठेवून गृहकर्ज घेतले. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित फायनान्स कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्तीसंदर्भात अर्ज दाखल ...

Crime against a couple who illegally took possession of the house | घराचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

घराचा बेकायदेशीर ताबा घेणाऱ्या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा

जळगाव : घर तारण ठेवून गृहकर्ज घेतले. मात्र, कर्जाचे हप्ते थकल्याने संबंधित फायनान्स कंपनीने जिल्हाधिकाऱ्यांकडे मालमत्ता जप्तीसंदर्भात अर्ज दाखल केला होता. अर्जाला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिल्यानंतर घराचा ताबा फायनान्स कंपनीकडे असतानासुद्धा कर्जदारांनी घराला लावलेले कुलूप तोडून घरात वास्तव्य केले. त्यामुळे दाम्पत्याविरुद्ध एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील विटनेर येथील जिरे माळीवाडा येथील गट क्रमांक ४७९/२ मधील प्लॉट क्रमांक ७७ मधील ब्लॉक नंबर ४/५ मध्ये एकूण क्षेत्रफळ १४२२.६५ चौरस मीटरपैकी ११०८ हे बांधीव क्षेत्राची मालमत्ता गहाण ठेवून सुकलाल पुंडलिक परदेशी व संगीताबाई सुकलाल परदेशी यांनी शुभम हाऊसिंग डेव्हलपमेंट फायनान्स कंपनी लिमिटेड जळगाव या शाखेकडून १४ लाख २० हजार २५ रुपयांचे गृहकर्ज घेतले होते. त्यांनी कर्जाची परतफेड न करता त्यांच्यावर आतापर्यंत २६ लाख २३ हजार ६२१ रुपये इतके देणे बाकी आहे. त्यांनी मालमत्ता एनपीए झाल्यामुळे तसेच थकबाकी न भरल्यामुळे मालमत्ता जप्तीसाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे अर्ज सादर केला होता. त्यानुसार जिल्हाधिकाऱ्यांनी सरफेशी कायद्यांतर्गत मालमत्ता जप्तीचे आदेश ९ मार्च २०२० रोजी दिले होते. त्यानुसार तहसीलदारांनी ९ एप्रिल रोजी जप्तीची कारवाई करीत त्याचा ताबा संबंधित फायनान्स कंपनीला दिला होता.

कुलूप तोडून घरात वास्तव्य

घराचा ताबा फायनान्स कंपनीकडे असताना १२ जून रोजी कंपनीचे वसुली अधिकारी पंकज पांडे व आसीफ इकबाल हे विटनेर येथे भेट देण्यासाठी गेले असता, त्यांना जप्त असलेल्या घराचे कुलूप तुटलेले दिसले. तसेच घरात सुकलाल व संगीता परदेशी हे दाम्पत्य वास्तव्यास असल्याचे पाहायला मिळाले.

वसुली अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल

संशयित सुकलाल व संगीता परदेशी या दाम्पत्याने गृह अतिक्रमण केल्याने त्यांच्याविरुद्ध आसीफ इकबाल यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Crime against a couple who illegally took possession of the house