आॅनलाईन लोकमतजळगाव, दि.१ : लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या सहाय्याने आकडा टाकून घरात वीज चोरी करणाºया शिवाजीनगरातील अमनपार्क येथील ९ जणांविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत यशवंत ठोसर यांनी ही फिर्याद दिली आहे़ एकाच अपार्टमेंटमधून तब्बल नऊ जणांनी आकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले आहे़महावितरणतर्फे आकोडा टाकून वीज चोरी करणाºयांवर कारवाई करण्यात येऊन गुन्हा दाखल करण्यात येत आहे़ १५ मे रोजी सकाळी ९ वाजता अतिरिक्त कार्यकारी अभियंता हेमंत ठोसर, महावितरण कर्मचारी ललित पाटील, एम़बी़पाटील अशांच्या पथकाने शिवाजीनगर भागातील अमनपार्क येथील मलिक अपार्टमेंट येथे वीज मीटरांची तपासणी केली़ त्यावेळी चक्क अपार्टमेंटमधील नऊ जणांनी आकोडा टाकून वीज चोरी केल्याचे उघड झाले़
जळगावात वीज चोरी करणाऱ्या ९ जणांविरूध्द गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 22:02 IST
लघुदाब वाहिनीवर काळ्या रंगाच्या सर्व्हिस वायरच्या सहाय्याने आकडा टाकून घरात वीज चोरी करणाºया शिवाजीनगरातील अमनपार्क येथील ९ जणांविरूध्द शुक्रवारी जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़
जळगावात वीज चोरी करणाऱ्या ९ जणांविरूध्द गुन्हा
ठळक मुद्देमलिक अपार्टमेंन्टमधील प्रकारआकडे टाकून सुरू होती वीजचोरीजिल्हापेठ पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल