सुवर्णकार समाजाची १७ रोजी क्रिकेट स्पर्धा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:52 IST2021-02-05T05:52:57+5:302021-02-05T05:52:57+5:30
जळगाव - स्वयंकर्तव्य प्रतिष्ठानतर्फे सुवर्णकार समाजासाठी १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी सागर पार्क येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात ...

सुवर्णकार समाजाची १७ रोजी क्रिकेट स्पर्धा
जळगाव - स्वयंकर्तव्य प्रतिष्ठानतर्फे सुवर्णकार समाजासाठी १७ आणि १८ फेब्रुवारी रोजी सागर पार्क येथे जिल्हास्तरीय क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत आठ संघ सहभागी होणार आहे. यात समाजबांधवांनी सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारी मंडळी ८ रोजी निवडणुक
जळगाव : जिल्हा सार्वजनिक ग्रंथालय संस्था आणि व्यक्ती सभासदांची विशेष सर्वसाधारण सभा सोमवारी दि. ८ रोजी शेठ नारायण बंकट वाचनालय, चाळीसगाव येथे दुपारी दोन वाजता आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत जळगाव जिल्हा ग्रंथालय संघाच्या कार्यकारिणीची त्रैवार्षिक निवडणुक होणार आहे. जिल्हा ग्रंथालय संघाचे कार्यवाह अनिल अत्रे याबाबतची सुचना प्रसिद्ध केली आहे. सार्वजनिक ग्रंथालयाचे पदाधिकारी व कर्मचारी सभेस वेळेवर उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय संघाने केले आहे.