क्रिकेट स्पर्धा : जळगाव जिल्हा संघाने पटकावले अजिंक्यपद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 9, 2021 04:21 IST2021-09-09T04:21:08+5:302021-09-09T04:21:08+5:30

विजेत्या संघातील खेळाडूंची शिबिरानंतर जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे. नागपूर येथील कलोडे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या १७ ...

Cricket Tournament: Jalgaon District team wins the title | क्रिकेट स्पर्धा : जळगाव जिल्हा संघाने पटकावले अजिंक्यपद

क्रिकेट स्पर्धा : जळगाव जिल्हा संघाने पटकावले अजिंक्यपद

विजेत्या संघातील खेळाडूंची शिबिरानंतर जम्मू येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड होणार आहे.

नागपूर येथील कलोडे महाविद्यालयाच्या मैदानावर झालेल्या १७ व्या सब-ज्युनिअर राज्य स्पर्धेत पहिल्या सामन्यात जळगाव संघाने सांगली संघावर ८ गडी राखत मात केली. दुसऱ्या सामन्यात धुळे संघांवर ३० धावांनी विजय मिळविला. अंतिम सामन्यात यजमान नागपूर जिल्हा संघावर जळगाव जिल्हा संघाने ४ धावांनी मात करीत अजिंक्यपद आपल्या नावे कोरले. यापूर्वी जळगाव संघाने २०१४- नाशिक, २०१५-अमळनेर, २०१६- मुंबई अशी सलग तीन वर्षे अजिंक्यपद पटकावले होते. विजय संघाला राज्य संघटनेचे सचिव डॉ. मोहम्मद बाबर, संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. बाबूलाल धोत्रे, उपाध्यक्ष व जिल्हा सचिव वासेफ पटेल, गिरीश पांडव, मनोज जाधव यांच्या हस्ते चषक देऊन सन्मानित करण्यात आले.

विजेता जळगाव जिल्हा संघ

संघाचे कर्णधार- लोकेश पाटील, आयुष पाटील, कृष्णा महाजन, हर्षवर्धन भोईटे, कौशल भोई, प्रणव चव्हाण, महेश पाटील, गणेश पाटील, हेमराज अहिरराव, अभिजित निनायदे, निरज सोनवणे.

प्रशिक्षक- अरविंद जाधव

व्यवस्थापक - विजय पाटील

जळगाव शहर संघ

प्रेम भावसार, रोहित बिऱ्हाडे, संस्कार सांगोरे, आदित्य पाटील, वैभव सोनवणे, अनिस तडवी, साहिल तडवी, मिरझान तडवी, तन्वीर तडवी, राहुल जाधव, अजिंक्य पाटील, अबुजर पटेल

प्रशिक्षक : साजीद तडवी

व्यवस्थापक : तारेक पटेल

प्रशिक्षक- मनोज जाधव, अरविंद जाधव, टीम मॅनेजर विजय पाटील

विजयी चषक स्वीकारताना जळगाव जिल्हा संघातील खेळाडू.

Web Title: Cricket Tournament: Jalgaon District team wins the title

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.