शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2019 11:08 IST

न्यायालयाच्या आदेशाने ६ जणांविरुध्द गुन्हा

ठळक मुद्दे व्याजासह कर्जाची रक्कम १८ लाख

जळगाव : वेगवेगळ्या फर्मचे व्यापारी असल्याचे भासवून कर्जाची परतफेड न करता गिरणा अर्बन सोसायटीची साडे तीन लाखात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन सहा कर्जदार व जामीनदाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी कर्ज घेतेवेळी गहाण ठेवलेल्या मिळकतींचीही बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन रविवारी रामानंदनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.गिरणा सोसायटीचे सचिव किशोर भागवत खडसे (रा.गिरणा टाकीजवळ, जळगाव) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, रामकृष्ण ओंकार ढाके यांनी केमीकल ट्रेडिंगचे व्यापारी राहूल उल्हास चौधरी यांनी मयुर ट्रेडर्स कन्सलटन्स नावाने खत विक्रीचा व्यवसाय असून त्यावर लिलाधर नरोत्तम राणे याने हे मार्केटींग मॅनेजर असल्याचे भासविले. यानंतर ढाके यांनी पत्नी ज्योती ढाके हिला संमतीदार तर राहूल चौधरी व लिलाधर राणे यांना जामीनदार म्हणून उभे करुन पतसंस्थेकडून व्यवसाय वाढीच्या कारणासाठी ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले.कर्ज साडे तीन लाख, व्याजासह झाले १८ लाखसंशयितांनी साडे तीन लाख रुपये कर्ज घेतले होते.त्याची परत फेड न केल्याने ३१ मार्च २०१८ अखेर ही रक्कम व्याजासह १८ लाख २८ हजार ७२४ वर पोहचली आहे. रकमेची मागणी केली असता सचिव खडसे यांना ढाके याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावर खडसे यांनी ढाके विरोधात रामानंद पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने किशोर ढाके यांनी न्यायलयात तक्रार दिली होती. न्यायालयाचे आदेशाने फसवणूकप्रकरणी रामकृष्ण ओंकार ढाके (५५), ज्योती रामकृष्ण ढाके (४८), राहूल उल्हास चौधरी (४० तिघे रा.रामदेव अपार्टमेंट एसएमआयटी कॉलेज समोर जळगाव), लिलाधार नरोत्तम राणे (५५ रा.राधाकिसनवाडी), महेश पुरूषोत्तम सोमानी (५०) , प्रदीप पुरूषोत्तम सोमाणी,(४८ दोघे रा. पिंप्राळा) यांच्याविरोधात भादंवि ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१ सह ३४ प्रमाणे रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.गहाण ठेवलेल्या मिळकतीची परस्पर विक्रीकर्ज घेते वेळी रामकृष्ण ढाके यांनी स्वत:च्या नावे असलेली एरंडोल तालुक्याती पिंप्री येथील गट नं ४५ शेतजमीन तर पत्नी ज्योती हिच्या नावे असलेली मेहरुणमधील शेत सर्व्हे २३६ अ/२ व २३७ यापैकी प्लॉट नं १३ या मिळकती पतसंस्थेजवळ गहाण ठेवल्या. कर्जफेड करत नसल्याने सचिव किशोर खडसे यांनी मिळकती जप्त करण्याची कारवाई केली असता ढाके यांनी बनावट खरेदीखत तयार करुन पिंप्री बुद्रुक येथील गहाण शेतजमीनीची परस्पर विक्री केल्याचे दिसून आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी