बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 11:07 AM2019-02-18T11:07:02+5:302019-02-18T11:08:20+5:30

न्यायालयाच्या आदेशाने ६ जणांविरुध्द गुन्हा

Creating fake documents and fraud | बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक

बनावट दस्ताऐवज तयार करुन फसवणूक

Next
ठळक मुद्दे व्याजासह कर्जाची रक्कम १८ लाख

जळगाव : वेगवेगळ्या फर्मचे व्यापारी असल्याचे भासवून कर्जाची परतफेड न करता गिरणा अर्बन सोसायटीची साडे तीन लाखात फसवणूक केल्याच्या आरोपावरुन सहा कर्जदार व जामीनदाराविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. या संशयितांनी कर्ज घेतेवेळी गहाण ठेवलेल्या मिळकतींचीही बनावट कागदपत्रांच्या आधारे विक्री केल्याचे समोर आले आहे. न्यायालयाच्या आदेशावरुन रविवारी रामानंदनगर पोलिसात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गिरणा सोसायटीचे सचिव किशोर भागवत खडसे (रा.गिरणा टाकीजवळ, जळगाव) यांनी फिर्याद दिली. त्यात म्हटले आहे की, रामकृष्ण ओंकार ढाके यांनी केमीकल ट्रेडिंगचे व्यापारी राहूल उल्हास चौधरी यांनी मयुर ट्रेडर्स कन्सलटन्स नावाने खत विक्रीचा व्यवसाय असून त्यावर लिलाधर नरोत्तम राणे याने हे मार्केटींग मॅनेजर असल्याचे भासविले. यानंतर ढाके यांनी पत्नी ज्योती ढाके हिला संमतीदार तर राहूल चौधरी व लिलाधर राणे यांना जामीनदार म्हणून उभे करुन पतसंस्थेकडून व्यवसाय वाढीच्या कारणासाठी ३ लाख ५० हजार रुपयांचे कर्ज घेतले.
कर्ज साडे तीन लाख, व्याजासह झाले १८ लाख
संशयितांनी साडे तीन लाख रुपये कर्ज घेतले होते.त्याची परत फेड न केल्याने ३१ मार्च २०१८ अखेर ही रक्कम व्याजासह १८ लाख २८ हजार ७२४ वर पोहचली आहे. रकमेची मागणी केली असता सचिव खडसे यांना ढाके याने शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिली. यावर खडसे यांनी ढाके विरोधात रामानंद पोलिसात तक्रार दिली होती. त्यानुसार अदखलपात्र गुन्ह्याची नोंदही करण्यात आली आहे. पोलिसांनी गुन्हा न दाखल केल्याने किशोर ढाके यांनी न्यायलयात तक्रार दिली होती. न्यायालयाचे आदेशाने फसवणूकप्रकरणी रामकृष्ण ओंकार ढाके (५५), ज्योती रामकृष्ण ढाके (४८), राहूल उल्हास चौधरी (४० तिघे रा.रामदेव अपार्टमेंट एसएमआयटी कॉलेज समोर जळगाव), लिलाधार नरोत्तम राणे (५५ रा.राधाकिसनवाडी), महेश पुरूषोत्तम सोमानी (५०) , प्रदीप पुरूषोत्तम सोमाणी,(४८ दोघे रा. पिंप्राळा) यांच्याविरोधात भादंवि ४२०, ४०६, ४६५, ४६८, ४७१ सह ३४ प्रमाणे रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
गहाण ठेवलेल्या मिळकतीची परस्पर विक्री
कर्ज घेते वेळी रामकृष्ण ढाके यांनी स्वत:च्या नावे असलेली एरंडोल तालुक्याती पिंप्री येथील गट नं ४५ शेतजमीन तर पत्नी ज्योती हिच्या नावे असलेली मेहरुणमधील शेत सर्व्हे २३६ अ/२ व २३७ यापैकी प्लॉट नं १३ या मिळकती पतसंस्थेजवळ गहाण ठेवल्या. कर्जफेड करत नसल्याने सचिव किशोर खडसे यांनी मिळकती जप्त करण्याची कारवाई केली असता ढाके यांनी बनावट खरेदीखत तयार करुन पिंप्री बुद्रुक येथील गहाण शेतजमीनीची परस्पर विक्री केल्याचे दिसून आले.

Web Title: Creating fake documents and fraud

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.