इंधन दरवाढीविरुद्ध भाकपचे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 9, 2021 04:11 IST2021-07-09T04:11:42+5:302021-07-09T04:11:42+5:30
चोपडा : पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल, औषधी दरवाढीविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गुरुवारी धरणे आंदोलन केले. केंद्र सरकार ...

इंधन दरवाढीविरुद्ध भाकपचे आंदोलन
चोपडा : पेट्रोल, डिझेल, गॅस, तेल, औषधी दरवाढीविरुद्ध भारतीय कम्युनिस्ट पार्टीने गुरुवारी धरणे आंदोलन केले.
केंद्र सरकार आपल्या अखत्यारित असलेल्या पेट्रोल, डिझेलचे भाव रोज वाढवत आहे व जनतेला पिळून काढत आहे. त्याचप्रमाणे गॅस, खाद्यतेल, साखर, आदींचे दरही वाढत आहेत. शेतकऱ्यांचे गरजेचे रासायनिक खते, बी बियाणे औषधी यांच्या दरवाढी सुरूच आहेत. तसेच सरकारी कार्यालयामध्ये कामाची कागदपत्रे त्यासाठी प्रतिज्ञा पत्रे, आदी फी वाढतच आहे. दुसरीकडे शेतमजूर, कष्टकरी यांचे मजुरी दरात वाढ नाही, आदी मागण्यांचा ऊहापोह करीत भाकपने तहसील कचेरीवर धरणे आंदोलन केले.
आंदोलनाचे नेतृत्व पक्षाचे जिल्हा सचिव लक्ष्मण शिंदे, अमृत महाजन, शांताराम पाटील, वासुदेव कोळी यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार श्रीकांत लोमटे यांना पक्षातर्फे निवेदन देण्यात आले.
आंदोलनात सोमनाथ महाजन, सोमा कुंभार, छोटू पाटील, सुमनबाई चौधरी, मीराबाई सोनवणे, रेखाबाई भालेराव, रंगुबाई बारेला, फुलाबाई बारेला, सुमनबाई माळी, पुंजाबाई भिल, प्रमिलाबाई भिल, चंदाबाई भिल, आदी कार्यकर्ते सहभागी होते.