शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
3
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
4
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
5
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
6
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
7
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
8
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
9
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
10
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
11
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
12
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
13
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
14
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
15
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
16
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
17
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
18
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
19
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
20
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
Daily Top 2Weekly Top 5

महामार्गावरील ‘गावठी’ उपाय ठरताय जीवघेणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2020 12:53 IST

विस्तारीत रस्त्यावर खडी, दगडांनी बनविले गतिरोधक : महामार्गाची अवस्था झाली बिकट

जळगाव : राष्टÑीय महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या आधीच रखडलेल्या व अर्धवट स्थितीत असलेल्या कामांनी वाहतूक व्यवस्थेचा अक्षरश: बोजवारा उडाला आहे. परिणामी रस्त्यावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याने हा महामार्ग जणू मृत्यूचा सापळाच बनला आहे. तर दुसरीकडे बांभोरी ते विद्यापीठ या दरम्यान गतीरोधक टाळण्यासाठी वाहन चालक अर्धवट रूंदीकरण झालेल्या रस्त्यावरून वाहन नेत आहेत. त्यांना अडविण्यासाठी गतीरोधकाच्या रांगेत दगड आणि खडीचा ढीग बनविण्यात आला असून ते अपघाताला निमंत्रण देत आहेत़शहरातील महामार्गावर होणाऱ्या अपघातांच्या मालिकांत अनेक जीव जाऊन त्यांचे संसार उघड्यावर पडले. या वाढत्या अपघातांना पायबंद घालण्यासाठी विविध संघटनांच्या जनआंदोलनानंतर या रस्त्याच्या चौपदरीकरणाला गती मिळाली. मध्यंतरी कासवगतीने रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या काम होत असल्यामुळे रस्त्यांची अत्यंत बिकट अवस्था झाली होती़ नंतर कामाला गती घेत सपाटीकरणाचे काम सुरू झाले़ मात्र, हे कामही धिम्या गतीने होत असल्यामुळे गैरसोय कायम आहे.रिफ्लेक्टर अथवा सूचना फलकाची आवश्यताबांभोरी ते विद्यापीठ दरम्यान बनविलेल्या रस्त्यांवर सूचना फलक तसेच कुठलेही रिफ्लेक्टर लावलेले नाही़ त्यामुळे रस्त्यावर पुढे काय काम सुरू आहे याचा अंदाज येत नाही़ आधीच विद्यापीठासमोरील रस्त्यावर चढ-उतार असून मोठे खड्डे सुध्दा पडलेले आहेत. त्यामुळे रिफ्लेक्टर आणि सूचना फलक लावण्याचे तसेच दगडांनी बनविलेले गतिरोधक काढण्याची मागणी वाहनधारकांकडून होत आहे़मृत्यूचा महामार्ग ठरलेल्या या रस्त्याचे काम त्आता तातडीने पूर्ण करण्यात यावे अशी मागणी आता जनमाणसातून होऊ लागली आहे.विद्यापीठासमोर अर्धवट गतिरोधककवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात शहरातून हजारो विद्यार्थी शहरातून ये-जा करीत असतात, त्याचबरोबर जवळचं कंपनी असल्यामुळे त्याठिकाणी दिवस-रात्र कर्मचाऱ्यांची ये-जा असते़ आधीच चौपदरीकरणाच्या अर्धवट कामामुळे रस्ता काही ठिकाणी रूंद तर काही ठिकाणी अरूंद आहे. विद्यार्थी आणि कर्मचाºयांना जीव मुठीत घेवून प्रवास करावा लागतो़ त्यात विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोरील महामार्गावर शंभर ते दीडशे मीटर अंतरांवर फायबरचे दोन ते तीन गतिरोधक टाकण्यात आले आहे़ मात्र, महामार्गाच्या रूंदीइतके न टाकता अर्धवट गतिरोधक टाकण्यात आले असून त्याच्या आजू-बाजूला खड्डे आणि चढ-उतार आहे. गतीरोधक टाळण्यासाठी वाहनचालक नेमके बाजूने वाहन नेत असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही़मुरूम, खडींनी बनविला गतिरोधकजैन इरिगेशन कंपनीसमोरील रस्त्यावर सुध्दा खडी आणि मुरूमाचा गतिरोधक बनविण्यात आला आहे़ दरम्यान, गावठी पध्दतीने बनविलेले गतिरोधक हा फक्त खडी आणि मुरूमाचा ढिग लावून बनविण्यात आल्या असल्यामुळे त्यावरून दुचाकीधारक गेल्यास तोल जावून पडण्याची शक्यता आहे़ त्यामुळे सपाटीकरण केलेल्या रस्त्यांवर गावठी पध्दतीने प्रवेश बंद करण्यासाठी वापरलेल्या उपाययोजना या अपघाताला निमंत्रण देणाºया ठरत आहेत.तर होवू शकतो अपघातमहामार्गावर विद्यापीठाचे फलक लावलेल्या ठिकाणी आधीच चढ-उतार असून त्यात फायबरचे गतिरोधक बनविण्यात आले़ मात्र, रस्त्याच्या कडेला असलेल्या कच्च्या रस्त्याचे सपाटीकरण करण्यात येत असल्यामुळे त्या रस्त्यावरून वाहनधारकांनी जावू नये म्हणून गतिरोधकाला लागून दगडाचे आणि खडीचे गतिरोधक बनविण्यात आले़

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव