वीज पोलला स्पर्श झाल्याने गाय ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2019 16:02 IST2019-07-25T16:02:02+5:302019-07-25T16:02:09+5:30
कासोदा येथील दुर्घटना

वीज पोलला स्पर्श झाल्याने गाय ठार
कासोदा-येथील भिकनदास मगनदास बैरागी यांची ३५ हजार रुपये किमतीची गाय घराजवळ बांधलेली असतांना घराशेजारी असलेल्या विजेच्या पोलला स्पर्श झाल्याने ती जागेवरच ठार झाल्याची दुदैर्वी घटना घडलीे.
यावेळी रिमझिम पाऊस सुरु होता.दररोज बांधायच्या जागेवर ही गाय बांधलेली होती. बुधवारी रात्री १२ चे सुमारास ही घटना घडलीे. घटना घडल्यानंतर स्थानिक वीज कर्मचारी रात्रीच आले या ठिकाणी आले होते.नंतर सकाळी विज अधिकाऱ्यांनी भेट देऊन माहिती घेतली आहे. सुदैवाने रात्र असल्याने मनुष्य हानी झाली नाही, या परिसरात लहान मुले दिवसभर खेळत असतात. लोखंडी पोल हटवून सिमेंटचे पोल संपुर्ण गावात बदलवले पाहिजेत अशी मागणी यानिमित्ताने होत आहे.