मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2018 18:01 IST2018-12-17T17:59:24+5:302018-12-17T18:01:19+5:30

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.

The cow killed in a tiger attack in Riggaon farming district of Muktainagar taluka | मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

मुक्ताईनगर तालुक्यातील रिगाव शेती शिवारात वाघाच्या हल्ल्यात गाय ठार

ठळक मुद्देपाच गायी झाडाला बांधलेल्या असताना रात्री घडली घटनागायीला खाण्याचादेखील वाघाने केला प्रयत्नसीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात झाला निर्णय

मुक्ताईनगर, जि.जळगाव : तालुक्यातील रिगाव येथे शेतीशिवारात वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार झाल्याची घटना १६ डिसेंबरच्या मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास घडली.
सूत्रांनुसार, रिगाव शेती शिवारातील गट क्रमांक ६२/१ या महादेव संपत पाटील यांच्या मालकीच्या शेतात त्यांच्याच पाच गाई झाडाला दोन ठिकाणी बांधलेल्या होत्या. त्यापैकी एका गायीवर रात्री दोन वाजेच्या सुमारास वाघाने हल्ला करत तिला ठार मारले आणि खाण्याचादेखील प्रयत्न केला आहे.
ही घटना सकाळी महादेव पाटील यांचा मुलगा मंगेश पाटील हा शेतात पोहोचल्यानंतर निदर्शनास आली. संबंधित घटनेबाबत वनविभागात सूचना देण्यात आली आहे. सायंकाळपर्यंत गायीया मृत्यूचा पंचनामा झालेला नव्हता. तसेच यासंदर्भात वनविभागातर्फे रात्री मृतकाचे शरीर तसेच ठेवून सीसीटीव्ही कॅमेरा लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे नेमका हल्ला कोणत्या प्राण्याने केला, असे स्पष्ट होणार आहे.

 

Web Title: The cow killed in a tiger attack in Riggaon farming district of Muktainagar taluka