कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2020 12:47 PM2020-05-19T12:47:26+5:302020-05-19T12:47:41+5:30

जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाने तीन ठिकाणी कोवीड केअरसेंटरची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी सुविधांच्या ...

 Covid Care status for those who are not corona | कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती

कोरोना न झालेल्यांना कोरोना अशी कोवीड केअरची स्थिती

Next

जळगाव : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत असताना मनपा प्रशासनाने तीन ठिकाणी कोवीड केअरसेंटरची व्यवस्था केली आहे. मात्र, याठिकाणी सुविधांच्या अभावामुळे ज्या व्यक्तींना कोरोना नाही अशा व्यक्तींनाही या ठिकाणी कोरोना होईल अशी स्थिती या कोवीड केअर सेंटरमध्ये दिसून येत आहे. एका खोलीत दोन व्यक्तींची व्यवस्था करण्यात आली असून, चार व्यक्ती एकच शौचालय वापरत असल्याचे चित्र अभियांत्रिकी महाविद्यालयातील केअर सेंटरमध्ये दिसून आले.
शहरात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाचे वसतीगृह, अल्पसंख्याक मुलींचे वसतीगृह, मनपाचे छत्रपती शाहू महाराज रुग्णालय व इकरा महाविद्यालय या ठिकाणी कोविड केअर सेंटर तयार करण्यात आले आहे. एकूण ६५० बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्यस्थितीत अभियांत्रिकी महाविद्यालयात २९ व्यक्ती क्वारंटाईन म्हणून ठेवण्यात आले आहेत. मात्र, त्यांना कुठल्याही सुविधा दिल्या जात नसल्याची तक्रार मनपा स्थायी समिती सभापती अ‍ॅड.शुचिता हाडा यांनी केली आहे. अ‍ॅड.हाडा यांनी दोन दिवसांपूर्वी अभियांत्रिकी महाविद्यालयातील केअर सेंटरची पाहणी केली असता, त्यांना या ठिकाणी समस्या आढळून आल्या. याबाबती त्यांनी आयुक्त सतीश कुलकर्णी यांना पत्र पाठविले आहे.

लक्षणे नसल्यास कुठलेही उपचार नाहीत
अ‍ॅड. हाडा यांनी केलेल्या तक्रारीच्या पत्रात म्हटले आहे की, केअर सेंटरमध्ये क्वारंटाईन करण्यात आलेल्या व्यक्तींना जर लक्षणे असतील तर च त्यांच्यावर उपचार केले जात आहे. तर ज्या व्यक्तींना लक्षणे नाहीत अशा व्यक्तींना कोणतीही औषधी दिली जात नाही. अशा व्यक्तींचा अहवाल निगेटीव्ह आला तर त्यांना घरी सोडण्यात येते. ज्यांना लक्षणे नसतील तर अशा व्यक्तींना केअर सेंटरमध्ये न ठेवता घरीच क्वारंटाईन करण्यात यावे असा सल्ला अ‍ॅड.हाडा यांनी दिला आहे. तसेच केअर सेंटरमध्ये क्व ारंटाईन केलेल्या व्यक्तींना सायंकाळ वसकाळचे जेवणासाठी एकत्र यावे लागत आहे. त्यामुळे कोरोनाची लागण होण्याचीही शक्यता अधिक असते असेही सभापतींनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे.

Web Title:  Covid Care status for those who are not corona

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.