साडेपाच एकरात साकारणार न्यायालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2021 04:13 IST2021-07-01T04:13:29+5:302021-07-01T04:13:29+5:30

शाहू नगरातील सिटी सर्व्हे क्र.९१८२ (स.न.२७५ पै) ही जागा आ.क्र.८५ बजीचा.......................... व आ.क.८६ सिव्हिक सेंटर यासाठी आरक्षित होती. दरम्यान, ...

The court will be set up in five and a half acres | साडेपाच एकरात साकारणार न्यायालय

साडेपाच एकरात साकारणार न्यायालय

शाहू नगरातील सिटी सर्व्हे क्र.९१८२ (स.न.२७५ पै) ही जागा आ.क्र.८५ बजीचा.......................... व आ.क.८६ सिव्हिक सेंटर यासाठी आरक्षित होती. दरम्यान, ही जागा न्यायालयासाठी मिळावी म्हणून न्यायालय व जिल्हा वकील संघाकडून सातत्याने पाठपुरावा सुरु होता. त्यासाठी मनपानेही सर्वसाधारण सभेत ठराव (क्र.१७४) करून तो ३ ऑगस्ट २०१९ रोजी विकास योजना व आरक्षणात बदल करून ही जागा जिल्हा सत्र न्यायालयासाठी आरक्षित करण्याबाबत नगरविकास मंत्रालयात पाठविला होता. दरम्यान, एक महिन्यापूर्वीच जिल्हा सरकारी वकील केतन ढाके व संजय राणे यांनी माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या माध्यमातून नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे साकडे घातले होते.

दरम्यान, नगरविकास मंत्रालयाचे कार्यासन अधिकारी प्रणव कर्पे यांच्या स्वाक्षरीने मंगळवारी ही अधिसूचना काढण्यात आली आहे. आरक्षण बदलाचा प्रस्ताव मंजूर करतानाच या आरक्षणाकरिता समुचित प्राधिकरण विधी व न्याय विभाग असेल अशीही अट या अधिसूचनेत टाकण्यात आली आहे.

Web Title: The court will be set up in five and a half acres

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.