न्यायालय व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

By Admin | Updated: May 30, 2017 00:37 IST2017-05-30T00:37:04+5:302017-05-30T00:37:04+5:30

खळबळ : इसिसच्या नावे निनावी पत्र

The court threatens to bomb the railway station and the bomb | न्यायालय व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

न्यायालय व रेल्वे स्टेशन बॉम्बने उडविण्याची धमकी

जळगाव : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शहा, शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया, ज्येष्ठ समाजसेक अण्णा हजारे, माजी मंत्री एकनाथराव खडसे, राष्ट्रपती भवन, शेगाव मंदिर देवस्थान, न्यायालय, रेल्वे स्थानक ही ठिकाणे बॉम्बस्फोटाने उडवून देण्याबाबतचे इसिसच्या नावे निनावी धमकी पत्र जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयाला टपालाद्वारे प्राप्त झाल्याने खळबळ उडाली आहे. याबाबत अपर जिल्हाधिका:यांनी 29 मे रोजी गृह विभागाच्या अपर मुख्य सचिवांना पत्र देऊन कार्यवाहीविषयी कळविले आहे.
 प्रशासनाचे पत्र व इसिसच्या नावे प्राप्त झालेले पत्र ‘लोकमत’च्या हाती लागले आहे.
धमकी देण्याचा हा प्रकार आता दुस:यांदा घडला आहे. वर्षभरापूर्वी असेच धमकीचे पत्र  जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाले होते. तेव्हा पोलीस व गुप्तचर यंत्रणा अलर्ट झाल्या होत्या. रेल्वे स्टेशन, सतरा मजली इमारत, वरणगाव ऑर्डनन्स फॅक्टरी, दीपनगर येथील वीज प्रकल्प आदी ठिकाणी बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.
जिल्हाधिकारी कार्यालयात प्राप्त झालेल्या या पत्रावर इसिस परभणी असे लिहिलेले आहे. संपूर्ण मजकूर हिंदी भाषेत लिहिला असून खाली सही सुद्धा केली आहे. या पत्राबाबत प्रशासनाकडून कमालिची गोपनियता बाळगण्यात येत आहे.
राजकीय मंडळी, धार्मिक स्थळे व इतर ठिकाणे उडवून देणारे धमकीचे कोणतेही पत्र जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आलेले नाही. 
-राहुल मुंडके, निवासी उपजिल्हाधिकारी.

Web Title: The court threatens to bomb the railway station and the bomb

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.