न्यायालयाचे कामकाज सुरु; मात्र प्रतिसाद अल्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:56 IST2021-02-05T05:56:18+5:302021-02-05T05:56:18+5:30
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बदल झालेले न्यायालयीन कामकाज सोमवारपासून नियमित सुरु झाले. प्रथम वर्ग, वरिष्ठ तसेच जिल्हा सत्र न्यायालयात ...

न्यायालयाचे कामकाज सुरु; मात्र प्रतिसाद अल्प
जळगाव : कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बदल झालेले न्यायालयीन कामकाज सोमवारपासून नियमित सुरु झाले. प्रथम वर्ग, वरिष्ठ तसेच जिल्हा सत्र न्यायालयात सर्वच कामकाजांना सुरुवात झाली, मात्र पक्षकारांचा प्रतिसाद अतिशय अल्प होता. जिल्हा सत्र न्यायालयात मात्र वर्दळ बऱ्यापैकी दिसून आली.
पहिला दिवस असल्याने पक्षकार अगदी मोजकेच आले होते.
कोरोनामुळे गेल्या आठ महिन्यापासून न्यायालयीन कामकाजात बदल करण्यात आला होता, आता १ फेब्रुवारीपासून नियमितपणे न्यायालयीन कामकाज सुरु करण्याचे आदेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश एस.डी.जगमलानी यांनी काढले आहे. न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, संशयित आरोपी, फिर्यादी, साक्षीदार, पक्षकार व वकिलांना आता प्रत्यक्ष हजर राहता येणार आहे. प्रथम सत्र ८, वरिष्ठ न्यायालय ६ व जिल्हा सत्र न्यायालय ५ अशा एकूण १९ न्यायालयात सोमवारी नियमित कामकाज झाले. बार कक्षातही वकिलांची संख्या बऱ्यापैकी दिसून आली. आपण स्वत: पाच न्यायालयात हजर राहून कामकाज चालविल्याची माहिती जिल्हा सरकारी वकील केतन ढाके यांनी ‘लोकमत’ ला दिली.