कारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 1, 2019 21:47 IST2019-09-01T21:46:37+5:302019-09-01T21:47:00+5:30

मंगरूळजवळील घटना : मुलगा गंभीर जखमी

 The couple were killed in the car crash | कारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

कारच्या धडकेत दाम्पत्य जागीच ठार

अमळनेर : भरधाव वेगाने अमळनेर कडून येणाऱ्या कारने मोटरसायकलला धडक दिल्याने पती-पत्नी जागीच ठार झाले. तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाल्याची घटना १ रोजी दुपारी १२.४५ वाजेच्या सुमारास लोंढवे ते मंगरूळ गावादरम्यान घडली. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला आहे.
अनिल पितांबर वाघ (वय ३३) रा. जानवे, ता.अमळनेर हे पत्नी सोनाली (२८) व मुलगा प्रियांश (७) यांना मोटरसायकल (क्रमांक एमएच-१९-एएफ-२१११)ने जानवे येथून पत्नी गर्भवती असल्याने उपचारासाठी खासगी रुग्णालयात नेत होते. त्यांना मंगरूळ शिवारात अमळनेरहून धुळ््याकडे जाणाºया लाल रंगाच्या कार (एमएच-१८-बीसी२११७)ने समोरून जोरदार धडक दिली. त्या धडकेत मोटरसायकल रस्त्याच्या कडेला शेतात फेकली गेल्याने अनिल व सोनाली हे जागीच ठार झाले. तर मुलगा प्रियांश गंभीर जखमी झाला. मयत सोनाली व अनिल यांचे शव रस्त्यावरून जाणाºया वाहनधारकांनी अमळनेर येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. जखमी प्रियांशला धुळे येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे. कारचालक हा गाडी सोडून घटनास्थळावरून पसार झाला आहे.
याबाबत भरत पुंजू पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून अमळनेर पोलिसात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी करीत आहेत.

 

Web Title:  The couple were killed in the car crash