विवरे येथील मृत पती-पत्नीचा झाला होता सहा महिन्यांपूर्वीच विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 17:05 IST2021-02-15T17:05:33+5:302021-02-15T17:05:44+5:30

आई-वडील आणि भावांना दु:ख अनावर

The couple was married six months ago | विवरे येथील मृत पती-पत्नीचा झाला होता सहा महिन्यांपूर्वीच विवाह

विवरे येथील मृत पती-पत्नीचा झाला होता सहा महिन्यांपूर्वीच विवाह

सद्दाम  पिंजारी

विवरे, ता. रावेर : किनगाव येथे झालेल्या अपघातातील मृतांमध्ये विवरे, ता. रावेर येथील रहिवासी संदीप युवराज भालेराव (वय २५) आणि दुर्गाबाई संदीप भालेराव (वय २०) या पती- पत्नीचा जागीच मृत्यू झाला. त्यामुळे विवरे गावावर शोककळा पसरली आहे. विवरे खुर्द गावातील रहिवासी संदीप भालेराव हा गावात ट्रॅक्टरचालक होता. त्याचे सहा महिन्याआधी दुर्गाबाईशी लग्न झाले होते. दुर्गाबाईचे माहेर अभोडा, ता. रावेर येथील आहे. संदीपच्या परिवारात आई-वडील आणि दोन भावांपैकी एक मोठा तर एक लहान भाऊ असा परिवार आहे.

आई-वडील आणि भावांना दु:ख अनावर

तरुण मुलाचा व सुनेचा मृत्यू झाल्याने संदीपचे आई-वडील व भावांना अश्रू अनावर झाल्याचे दु:खद चित्र मन हेलावून टाकणारे होते.

शोकाकुल वातावरणात झाले अंत्यसंस्कार

विवरे खुर्द तालुका रावेर या ठिकाणी या पती-पत्नीवर शोकाकुल वातावरणात गावकरी व समाज बांधवांच्या उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

Web Title: The couple was married six months ago