जळगाव जिल्ह्यात महामार्गावर दाम्पत्याला उडविले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2018 23:14 IST2018-01-11T23:10:32+5:302018-01-11T23:14:04+5:30
धुळे येथून जळगावला येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रियंका सुशील पवार (वय २८, रा.चोरगाव, ता.धरणगाव ह.मु.वाघ नगर, जळगाव) ही विवाहिता जागीच ठार झाली तर पती सुशील शिवाजी पवार (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची १४ महिन्याची मुलगी मानसी ही आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोलजवळ महामार्गावर हा अपघात झाला.

जळगाव जिल्ह्यात महामार्गावर दाम्पत्याला उडविले
आॅनलाईन लोकमत
जळगाव दि,११ : धुळे येथून जळगावला येत असताना अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने प्रियंका सुशील पवार (वय २८, रा.चोरगाव, ता.धरणगाव ह.मु.वाघ नगर, जळगाव) ही विवाहिता जागीच ठार झाली तर पती सुशील शिवाजी पवार (वय ३०) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांची १४ महिन्याची मुलगी मानसी ही आश्चर्यकारकरित्या बचावली आहे. गुरुवारी सायंकाळी सहा वाजता एरंडोलजवळ महामार्गावर हा अपघात झाला.
महावितरण कंपनीत वायरमन असलेले सुशील पवार हे गुरुवारी धुळे येथून काम आटोपल्यानंतर पत्नी प्रियंका व मुलगी मानसी असे दुचाकीने जळगावला येत असताना एरंडोलजवळ कृष्णा हॉटेल समोर त्यांच्या दुचाकीला अज्ञात वाहनाने उडविले. या अपघातात पत्नीचा जागीच मृत्यू झाला तर जखमी पतीला शहरातील खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. देव तारी त्याला कोण मारी या उक्तीप्रमाणे पवार यांची १४ महिन्याची मानसी सुखरुप आहे. प्रियंका यांचे माहेर ममुराबाद आहे. रात्री जिल्हा रुग्णालयात मृतदेह आणल्यानंतर नातेवाईक व मित्रांची मोठी गर्दी झाली होती.