बलात्काराची धमकी देत दाम्पत्यास मारहाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:28 IST2021-03-04T04:28:06+5:302021-03-04T04:28:06+5:30
जळगाव : माझ्याकडे काय बघतेय, भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत ३१ ...

बलात्काराची धमकी देत दाम्पत्यास मारहाण
जळगाव : माझ्याकडे काय बघतेय, भर चौकात नग्न करुन बलात्कार करुन तुझ्या मुलाला मारुन टाकेन अशी धमकी देत ३१ वर्षीय महिला व तिच्या पतीला काठीने मारहाण केल्याची घटना एमआयडीसीतील सदगुरु नगरात घडली आहे. याप्रकरणी सोमवारी रात्री एमआयडीसी पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारीवरुन गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, दोन्ही कुटुंबात झालेल्या घरगुती वादातून हे प्रकरण पोलीस ठाण्यापर्यंत पोहचले.
एका गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून रतिराम सावकारे, धीरज रतिराम सावकारे, वृषाली रतिराम सावकारे, सरोज लोखंडे व ललिता श्यामराव जयकर (रा.जुने एमआयडीसी) यांच्याविरुध्द विनयभंग, दंगल व घरात घुसून मारहाण केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.दुसऱ्या गटातील महिलेने दिलेल्या फिर्यादीवरुन या दाम्पत्याविरुध्दही विनयभंग व अश्लिल वर्तन केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे. यातील फिर्यादीच्या वडिलांना पाहून संशयित महिलेने गच्चीवर असताना त्यांना अश्लिल बोलून मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या गुन्ह्यांचा तपास अंमलदार विजय लोटन पाटील करीत आहे.