समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट
By Admin | Updated: October 6, 2015 00:43 IST2015-10-06T00:43:42+5:302015-10-06T00:43:42+5:30
आशा मिरगे : शासकीय कार्यालयांमधील लैंगिक अत्याचाराच्या प्रकारातही वाढ

समुपदेशनाअभावी वाढले घटस्फोट
जळगाव : योग्य समुपदेशनाचा अभाव व कुटुंबांमधील अहंभावामुळे घटस्फोटाच्या प्रमाणात वाढ होत असून युवक-युवतींचे यातून मोठे नुकसान होत असल्याची माहिती राज्य महिला आयोगाच्या सदस्या डॉ.आशा मिरगे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. मिरगे म्हणाल्या, जळगाव जिल्ह्यातील काही कौटुंबिक प्रश्नांवर निर्णयासाठी मिरगे या सोमवारी येथे आल्या होत्या. मुलींमध्ये सहनशीलतेचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे सहन करण्याची भावना अनेकांमध्ये जन्मजात असते. मात्र होणा:या अन्यायाविरुद्ध त्यांनी पुढे येण्याची गरज आहे. त्रासाचा पुरावा ठेवणे आवश्यक पूर्वी 498 हा महिला अत्याचार, सासरच्यांकडून होणा:या त्रासाचा गुन्हा अजामीनपात्र होता. 2005 नंतर परिस्थिती बदलली. आता केलेला आरोप सिद्ध करावा लागतो. त्यामुळे होणा:या त्रासाचा काही ना काही पुरावा महिलांजवळ असणे आवश्यक आहे. कौटुंबिक अत्याचारात महिलांवर मानसिक अत्याचाराचे प्रमाण हे जास्त असते. त्याबरोबरच शारीरिक, आर्थिक, लैंगिक, सामाजिक शोषण, कामाच्या ठिकाणी लैंगिक अत्याचाराचे प्रकारही वाढले आहेत. या संदर्भातील जागृतीमुळे तक्रारी करण्यास संबंधित महिला पुढे येत असतात. विवाहपूर्व समुपदेशन केल्यास घटस्फोटाचे प्रमाण घटणार कुटुंबांमध्ये समन्वय नसल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते. तसेच मुलगा आणि मुलीकडील कुटुंबांमध्येही अहंभाव असतो. यातून घटस्फोटाचे प्रमाण वाढले आहे. विवाहपूर्व समुपदेशन केल्यास घटस्फोटाचे प्रमाण कमी होऊ शकेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला. लगA उशिरा होणे व हॉटेल्समुळे अत्याचारात वाढA हे वयाच्या 30 व्या वर्षानंतर ब:याच ठिकाणी होते. मात्र शारीरिक भावना या दाबता येत नाहीत. त्यातून अत्याचाराचे प्रकार वाढले आहेत. याबरोबच हॉटेल्स सारख्या ठिकाणी सहज प्राप्त होणारे एकांत हेदेखील घातक ठरत असून अत्याचाराचे प्रकार यामुळे वाढले आहेत. तडजोड होण्याची भूमिका ही आजच्या युवकांमध्ये बरीच असते. त्यातून लग अत्याचार पीडित साफीयाची 12 वर्षानी सुटका मिरगे यांनी सांगितले, अकोला येथील साफीया या युवतीस तब्बल साडेबारा वर्षे एका खोलीत कोंडून ठेवले होते. तिच्यावर अत्याचार झाले. याची माहिती मिळाल्यावर तिची सुटका केली. 12 नोव्हेंबर 2014 ला तिची सुटका झाली. तिला मानसिक आजार जडला असून उपचार सुरू आहेत. आपण व्यवसायाने डॉक्टर आहोत. एमबीबीएसचे शिक्षण झाल्यावर महिलांचे बाळंतपण करत असताना त्यांच्या व्यथा समजल्या. त्यातून महिला अत्याचाराविरोधात काम करण्याची प्रेरणा मिळाली, असेही मिरगे म्हणाल्या.