आॅनलाईन लोकमतजळगाव,दि.१७ : मनपा निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नगरसेवकांसह महापौर, सभागृह नेत्यांसह बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी मनपाकडे पाठ फिरविली असल्याचे दिसून येत आहे. नगरसेवक आपआपल्या प्रभागातच व्यस्त असून आगामी निवडणुकांच्या तयारीला सुरुवात केली आहे.प्रभाग रचनेत अनेकांचे जुने प्रभाग फुटले आहेत. तर काहींच्या प्रभागांमध्ये इतर प्रभागांचा भाग जोडला गेल्याने दिग्गजांसह अनेक विद्यमान नगरसेवकांचे समीकरण बिघडले आहे. त्यातच प्रभाग रचनेची व्याप्ती पाहता सर्वच उमेदवारांना निवडून येण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे नेहमी मनपा इमारतीत डेरेदाखल असणारे नगरसेवक व पदाधिकाºयांनी सध्या मनपाकडे दुर्लक्ष करून आपले लक्ष केवळ प्रभागांमध्येच केंद्रीय केलेले दिसून येत आहे. त्यामुळे मनपात शुकशुकाट पहायला मिळत आहे.
जळगावात नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 19:09 IST
प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर मनपामध्ये कुणीही फिरकेना
जळगावात नगरसेवकांना लागले निवडणुकांचे वेध
ठळक मुद्देप्रभाग रचनेत अनेकांचे जुने प्रभाग फुटले आहेत.प्रभाग रचनेची व्याप्ती पाहता उमेदवारांना करावी लागणार निवडून येण्यासाठी कसरतनगरसेवक आपआपल्या प्रभागातच व्यस्त