शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
5
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
6
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
7
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
8
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
9
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
10
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
11
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
12
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
13
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
14
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
15
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
16
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
17
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
18
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
19
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
20
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?

व्यापारी व सीसीआयच्या सेटींगमुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचे मरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 20, 2019 11:58 IST

नियमांना शेतकरी कंटाळले

अजय पाटील जळगाव : कापूस उत्पादक शेतकºयांचा व्यथा संपण्याचे नाव घेत नाही. सीसीआयच्या शासकीय खरेदी केंद्रावर शेतकºयांचा मालावर नियम व अटींचा फास घालून शेतकºयांची लूट सुरु असल्याचा प्रकार समोर येत आहेत. जो माल सीसीआय नियमांमध्ये नसल्याचे सांगत खरेदी करत नाही, असा माल शेतकºयांना कमी भावात खासगी व्यापाºयांकडे विक्री करावा लागत आहे. त्याच व्यापाºयांकडून सीसीआयच्या केंद्रावर व्यापाºयांना व सीसीआयलाही फायदा होईल अशा भावात खरेदी केला जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.व्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांनी केलेल्या सेटींगमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे. मात्र, शेतकºयांसाठी नेहमी कैवारी असलेल्या लोकप्रतिनिधींकडून या प्रकाराबद्दल चकार शब्द देखील काढला जात नसून, शेतकºयांचा नावावर राजकारण करणाºया संघटनांनी देखील या प्रकारावर डोळेझाक करणारी भूमिका घेतली आहे. त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेमुळे आधीच मेटाकुटीस आलेला शेतकरी व्यापारी व सीसीआयच्या अधिकाºयांचा साठमारीमुळे मोठ्या प्रमाणात अडचणीत आला आहे.शेतकºयांना फायदा नाहीचशेतकºयांना हमी भाव सोडाच नफा होईल एवढाही फायदा होत नसल्याचे चित्र कापूस खरेदी केंद्रावर दिसून येत आहे.मात्र, शेतकºयांचे प्रश्न सुटतील यासाठी कोणीही प्रयत्न करताना दिसून येत नाही, अशी स्थिती आहे.शेतीच्या उताºयावरील नियमांमुळे शेतकरी ग्रस्तसीसीआयच्या केंद्रावर आपला माल घेवून आल्यानंतर शेतकºयांना अनेक नियम व अटींना सामोरे जावे लागते. कापसाची आर्द्रता तपासली जाते. ८ किंवा त्यापेक्षा कमी टक्के आर्द्रता असेल तरच शेतकºयांना ५ हजार ५५० चा हमी भाव दिला जातो. ८ ते १२ टक्के आर्द्रता असेल तर ५२०० ते ५३०० व १२ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर मालच खरेदी केला जात नाही. यंदा पाऊस असल्याने कापसात आर्द्रतेचे प्रमाण हे जास्तच आहे. तसेच एका दिवसात एका शेतकºयाकडून ४० क्विंटलच कापूस खरेदी केली जातो. ४० क्विंटल पेक्षा जास्त माल असेल तर शेतकºयाला दुसºया दिवशी तो माल विक्रीसाठी आणावा लागतो. शेतकºयांना माल विक्री करताना शेतीचा उत्तारा बंधनकारक आहे. मात्र, एखादा शेतकरी इतरांची शेती करत असेल अशा शेतकºयांना उतारा सादर करताना अडचणी येतात. माल खरेदी केल्यानंतर तत्काळ पैसे न मिळता आठ ते दहा दिवस शेतकºयाला वाट पहावी लागते. अशा अनेक नियम व अटींमुळे मोठ्या प्रमाणात त्रस्त झाला आहे.असा चालतो सेटींगचा खेळ...आर्द्रतेचा नावार जो माल सीसीआयकडून नाकारला जातो. तो माल शेतकºयांना नाईलाजास्तव व्यापाºयांना ४५०० ते ४६०० इतक्या दराने विक्री करावा लागतो. हाच माल व्यापाºयांकडून सीसीआयच्या केंद्रावर ५ हजार ते ५२०० रुपये दराने खरेदी केला जातो. यामुळे व्यापाºयांना प्रतिक्विंटल मागे ३०० ते ४०० रुपयांचा फायदा होत आहे. तर सीसीआयला देखील हमीभावात माल खरेदी करावा लागत नसल्याने २०० ते ३०० रुपयांचा फायदा होत आहे. तर दुसरीकडे कापूस पिकविणाºया शेतकºयाला हमीभाव मिळत नसल्याने तब्बल ८०० ते १ हजार रुपयांपर्यंतचे नुकसान सहन करावे लागत आहे. व्यापारी व सीसीआयने केलेल्या सेटींगमुळे शेतकºयांचे नुकसान होत आहे.चीनमध्ये मागणी नसल्याने भाव स्थिर...ंअमेरिका व चीनमधील ट्रेडवॉर व भारताच्या कापसाचे आंतरराष्टÑीय बाजारात जास्त असलेल्या भावामुळे भारतातील कापसाच्या निर्यातमध्ये गेल्या वर्षाच्या तुलनेत ५० टक्क्यांची घट झाली आहे. मुख्य निर्यातदार देश असलेल्या चीनने देखील भारताकडून कापसाची खरेदी थांबवली आहे. यामुळे सध्या भारताचा कापूस केवळ बांग्लादेशमध्येच निर्यात केला जात आहे. त्यामुळे भारतात मोठ्या प्रमाणात कापसाचा साठा होत आहे. याचा परिणाम कापसाच्या भावावर होत असून, शासनाच्या हमीभाव ५ हजार ५५० या रक्कमेवरच भाव स्थिर आहेत. ट्रेडवॉरवर परिणाम झाला किंवा कापसाची मागणी वाढली तरच कापसाच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे १५ जानेवारीपर्यंत तरी कापसाच्या भावात कोणतीही घट किंवा वाढ होण्याची शक्यता नाही.शेतकºयांची सासीआयच्या केंद्रावर अक्षरश लुट सुरु आहे. मोठ्या प्रमाणात नियम व अटी शेतकºयांवर लादल्या जात असून, शेतकºयाला आपला माल व्यापाºयांना कमी भावात विक्री करण्यासाठी भाग पाडले जात आहे. व्यापारी शेतकºयांकडू कमी दरात माल घेतो व तोच माल सीसीआयला जास्त भावात विक्री करतो. व्यापाºयांकडून जर सीसीआय माल खरेदी करत आहे. तर शेतकºयांकडून खरेदी करण्यास काय अडचण आहे?-दीपक मंगल पाटील, शेतकरी, आव्हाणशेतकºयांना शासकीय खरेदी केंद्रावर माल आणताना कोरडा माल आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाजारभावापेक्षा जर ५०० रुपये जादा दर सीसीआयच्या केंद्रावर कापूस उत्पादक शेतकºयाला मिळत असेल तर सीसीआयकडून चांगलाच माल खरेदी केला जाईल. सीसीआयचे नियम हे शासनाने ठरवून दिलेले आहेत.-कैलास चौधरी, सभापती, बाजार समिती, जळगाव

टॅग्स :Jalgaonजळगाव