संततधारमुळे ज्वारीसह कापसाला फटका

By Admin | Updated: September 21, 2015 00:48 IST2015-09-21T00:48:48+5:302015-09-21T00:48:48+5:30

संततधारमुळे ज्वारीसह कापसाला फटका प्रशासनाकडून आढावा : जलपातळीत वाढ झाल्याने शेतक:यांमध्ये समाधान

Cotton gourd with jowar | संततधारमुळे ज्वारीसह कापसाला फटका

संततधारमुळे ज्वारीसह कापसाला फटका

भुसावळ : भुसावळ विभागात गुरुवारी व शुक्रवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतक:यांना दिलासा मिळाला असलातरी ज्वारीसह कापसाला मोठा फटका बसला आह़े प्रशासनाकडून नुकसानीचा आढावा घेतला जात आह़े

दरम्यान, रविवारी शहरात दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास पावसाच्या पुन्हा शिडकावा झाल्याने वातावरणात बदल झाला़

कापूस आडवा तर ज्वारी पडली काळी

भुसावळ शहर व तालुक्यात गेल्या दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बागायती कापसाला फटका बसला असून ज्वारी आडवी पडली नसलीतरी काळी मात्र पडल्याने मोठय़ा प्रमाणावर शेतक:यांना नुकसान झाले आह़े

कृषी विभागाच्या आकडेवारीनुसार खरीपात ज्वारी (दोन हजार 550 हेक्टर) मका दोन हजार 575, उडीद एक हजार 223, सोयाबीन तीन हजार 219, मूग 781, तूर 580, कापूस बागायती चार हजार 616, जिराईत कापूस 10 हजार 19 हेक्टर पेरण्यात आला होता़ मुसळधार पावसात 448 हेक्टरवरील ज्वारी काळी पडली तर 12 हेक्टरवरील मका, 43 हेक्टरवरील सोयाबीन तर 27 हेक्टरवरील बागायती कापसाला फटका बसला आह़े

रावेर : बागायतीला फटका

रावेर तालुक्यात सरासरी 52 तर शनिवारी सरासरी 27 मि.मी.झालेल्या पावसामुळे 13 हजार हेक्टरवरील पूर्वहंगामी बागायती कापसाचा पहिला वेचा तब्बल 36 तास पावसात भिजून व कापसाची बोंड सुटून कमालीचे नुकसान झाले आहे.

उत्तरेचा पाऊस भूजलपातळी उंचावण्यासाठी फायदेशीर असल्याने शेतकरी वर्गात समाधान आहे.

उडीद-मूगाचे उत्पादनाला मोठा फटका बसला असतानाच खरीपाच्या जिरायत कापसाची वाढ खुंटली. ज्वारी मूर रोगाने कुठे उद्धवस्त झाली तर कुठे भुईसपाट झाली. बागायत कापसाचे उत्पादन शेतक:यांच्या उंबरठय़ावर असताना भीज व संततधार पावसाने कापसाचे बोंड सडून तर कुठे अपरिमीत हानी झाली. 13 हजार हेक्टरवरील कापसाचे उत्पादन धोक्यात आले आह़े

दरम्यान, यावल व मुक्ताईनगर तालुक्यातील ज्वारीसह कापसालादेखील मोठय़ा प्रमाणावर फटका बसला आह़े शेतक:यांच्या उंबरठय़ावरील पिके हातातून गेल्याने शेतक:यांमध्ये नैराश्याची भावना पसरली आह़े कृषी विभागाने पंचनामा करून भरपाई देण्यासंदर्भात दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आह़े

Web Title: Cotton gourd with jowar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.