शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

बोदवड येथे रस्त्यावर कापसाची बर्निंग ट्रक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2019 19:16 IST

लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमधील मजुरांनी खाली उड्या मारल्या. यामुळे ते सुरक्षित राहिले.

ठळक मुद्दे लोंबकळणाऱ्या वीज तारांचा कापसाच्या ट्रकचा स्पर्श ट्रकसह कापसाचे नुकसानजीवित हानी टळलीमनूर रस्त्यावरील भरदुपारची घटनाचालकासह ट्रकमधील मजुरांनी उड्या मारल्याने ते सर्व सुरक्षित

बोदवड, जि.जळगाव : लोंबकळणाºया वीज तारांचा ट्रकला स्पर्श होऊन कापसाने भरलेला ट्रक भर रस्त्यावर जळून खाक झाला. यात कापसासह ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. बोदवड-मनूर रस्त्यावर सोमवारी दुपारी चारला ही घटना घडली. कापसाला आग लागल्याचे निदर्शनास येताच चालकासह ट्रकमधील मजुरांनी खाली उड्या मारल्या. यामुळे ते सुरक्षित राहिले.बोदवडसह परिसरातील खेड्यांवरून सुमारे ५० क्विंटलपर्यंत कापसाने भरलेला ट्रक (क्रमांक एमएच-१९-झेड-२२८१) बोदवडकडे येत होता. बोदवड शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर मनूर रस्त्यावर हा ट्रक आला. तेव्हा रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी जात असलेल्या उच्च दाबाच्या लोंबकळलेल्या विद्युत तारांचा ट्रकमधील कापसाला स्पर्श झाला. कडक उन्ह होते. यामुळे येथे आगीची ठिणगी उडत कापसाच्या गंजीला लागली. आगीने हळूहळू उग्र रूप धारण करण्यास सुरुवात केली. आग लागल्याचे पाहताच या ट्रकच्या कॅबिनवर बसलेल्या आठ ते दहा मजुरांनी आरडाओरडा करण्यास सुरुवात केली. यामुळे धावत्या ट्रकमधून मजुरांनी उड्या मारल्या. यातच ट्रकचालक मुकेश खराटे यानेही प्रसंगावधान राखत वाहन जागेवरच बंद केले आणि वाहनातून उडी मारली. यामुळे चालकासह ट्रकमधील सर्व मजूर सुरक्षित राहिले. आगीत सुमारे सात क्विंटलपेक्षा अधिक कापूस जळून खाक झाला. तसेच मिनी ट्रकचा पुढील भाग पूर्णपणे जळून खाक झाला.यानंतर गाडीचालकाने गाडीमालक अभय बाफना रा.बोदवड यांना या घटनेची माहिती कळविली. त्यांनी जामनेर येथील अग्निशमन दलाला पाचारण केले. नंतर आग आटोक्यात आली, परंतु तोपर्यंत ट्रकमधील कापूस जळून खाक झालेला होता.दरम्यान, वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जात तुटलेल्या वीज तारांचा वीजपुरवठा खंडित केला. मात्र वीज वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे आर्थिक नुकसान झाल्याची भावना या वेळी व्यक्त करण्यात आली.या घटनेत कापसाचे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

टॅग्स :fireआगBodwadबोदवड