शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
3
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
4
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
5
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
6
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
7
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
8
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
9
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
10
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
11
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
12
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
13
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
14
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
15
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
16
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
17
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
18
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
19
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
20
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?

आईच्या आजाराचा खर्च वाढला; तरुणाची आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2020 12:59 PM

भादली/ जळगाव : आईच्या आजारपणावर उपचार व औषधीसाठीचा खर्च पेलवला जात नसल्याने सुशांत छोटूराम इंगळे (१९) या तरुणाने राहत्या ...

भादली/ जळगाव : आईच्या आजारपणावर उपचार व औषधीसाठीचा खर्च पेलवला जात नसल्याने सुशांत छोटूराम इंगळे (१९) या तरुणाने राहत्या घरात दोरीने गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी दुपारी एक वाजता उघडकीस आली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुशांत याची आई उषाबाई ही पोटाच्या विकाराने ग्रस्त आहे. त्यांना दवाखान्यासाठी मोठा खर्च लागत आहे. तशाही परिस्थितीत आई दुसऱ्याच्या शेतात मजुरी करते तर बहिण पूजा ही देखील येवला, जि.नाशिक येथे नर्सिंगचा कोर्स करीत आहे.तिलाही शिक्षणासाठी खर्च लागत आहे. सुशांत पंधरा दिवसाचा असतानाच वडीलांचे निधन झाले. त्यामुळे संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी सुशांतवर होती. ट्रॅक्टरवर मजुरीचे काम करुन मोठी कसरत होत होती. आईचे आजारपण, बहिणीचा शिक्षणाचा खर्च पेलवू शकत नसल्यामुळे नैराश्य आलेल्या सुशांतने राहत्या घरातच गळफास घेऊन आत्महत्या.आई शेतात तर घरी मुलाची आत्महत्यासुशांतची आई उषाबाई मंगळवारी गावातीलच राजेश पाटील यांच्या शेतात मजुरीच्या कामाला गेली होती. त्यामुळे सुशांत हा एकटाच घरी होता. दुपारी एक वाजता सुशांत हा गळफास घेतल्याच्या अवस्थेत शेजारच्या लोकांना दिसला. त्यांनी राजेश पाटील यांना ही घटना कळविली.पाटील यांनी दुचाकीवरुन उषाबाई यांना घरी आणले. मुलाचा मृतदेह पाहिल्यानंतर आईने हंबरडा फोडला.तिची शुध्द हरपली होती. घटनास्थळाचा पंचनामा केल्यानंतर मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आला. शवविच्छेदन झाल्यानंतर सायंकाळी सुशांतवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीJalgaonजळगाव