शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीत 'इमोशनल इम्पॅक्ट' ओसरतोय?; सुनेत्रा पवारांच्या प्रचारातील 'या' फॅक्टर्समुळे वारं फिरण्याची शक्यता
2
Jairam Ramesh : "राहुल गांधी हे राजकारणातील अनुभवी खेळाडू, बुद्धिबळाच्या काही चाली बाकी आहेत"
3
Narendra Modi : "आज मीही सांगतो... घाबरू नका, पळू नका"; पंतप्रधान मोदींची राहुल गांधींवर खोचक टीका
4
उद्धव ठाकरेंनी शब्द दिला अन् ऐनवेळी फिरवला; विजय करंजकरांनी भरला अपक्ष अर्ज
5
Share Market : शेअर बाजारात हाहाकार; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; रिलायन्स आपटला
6
वृषभ संक्रांती: ७ राशींवर सूर्यकृपा, नोकरी-व्यवसायात फायदा; पद-पैसा वृद्धी, लाभाचा काळ!
7
Lalu Prasad Yadav : "पाकिस्तान, स्मशानभूमी, हिंदू-मुस्लिम..."; लालू प्रसाद यादव यांचा नरेंद्र मोदींना खोचक टोला
8
दुधाचे दात पडण्याआधी कॉम्प्युटर शिकले, शाळेत शिकताना बनले सर्वात तरुण सीईओ...
9
पराभव, भीती की रणनीती...! राहुल गांधींनी अमेठीऐवजी रायबरेली मतदारसंघ का निवडला?
10
Apple नं केला कमाईचा रकॉर्ड; एका दिवसात Mukesh Ambani यांच्या नेटवर्थपेक्षा अधिक वाढलं मार्केट कॅप
11
अ‍ॅडव्हान्स फीचर्ससह पल्सरचे नवीन मॉडेल लाँच, टॉप स्पीड पाहून बसेल धक्का!
12
Share Market Upcoming IPO : पैसे तयार ठेवा! या महिन्यात कमाईची संधी; कंपन्या IPO मधून १० हजार कोटी उभारणार
13
'माफी मागा, तुमच्या घाणेरड्या आरोपांनी...'; चित्रा वाघ यांना 'त्या' अभिनेत्याचा कारवाईचा इशारा
14
सुशांत सिंह राजपूतच्या जीवाला होता धोका? बहिणीने केला मोठा खुलासा
15
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
16
जागावाटपाच्या वाटाघाटीत शिंदे जिंकले, जे हवे होते ते मतदारसंघ घेतले; भाजपाने नेमके काय साधले?
17
Kangana Ranaut : "राजपुत्र पत्नीसोबत चांगलं वागत नाही, छळ करतात"; कंगनाचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर पलटवार
18
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : ठाकरे गटाच्या अडचणीत वाढ, विजय करंजकर अपक्ष उमेदवारी अर्ज भरणार
19
Chaitra Amavasya 2024: वास्तूला आणि कुटुंबियांना कायम निरोगी ठेवण्यासाठी चैत्र अमावस्येपासून सुरू करा 'हे' व्रत!
20
Akshaya Tritiya 2024: पूर्वीचे लोक अक्षय्य तृतीयेनंतरच आंबा खायचे? असे का? वाचा त्यामागचे कारण!

साफसफाईच्या ठेक्यात १ कोटी २० लाखांचा भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 09, 2020 12:42 PM

सुनील महाजन : पुराव्यानिशी नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार करणार, ९५ टक्के हजेरी बोगस असल्याचा ठपका

जळगाव : मनपाच्या सत्ताधाऱ्यांनी सहा महिन्यांपासून वॉटरग्रेसचे काम थांबवून एस. के. कॉन्ट्रॅक्टरला शहराच्या साफसफाईचा ठेका दिला आहे. यासाठी मनपाने जवळपास २ कोटी. ४० लाख रूपये दिले आहेत. यासंदर्भात कागदपत्रांची तपासणी केली असता यामध्ये सत्ताधाऱ्यांचा सहभाग आहे. या ठेक्यात सुमारे १ कोटी २० लाखांचा भ्रष्ट्राचार झाला असल्याचा आरोप मनपाचे विरोधी पक्षनेते सुनिल महाजन यांनी बुधवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेद्वारे केला आहे. तसेच या गैरव्यवहारा संदर्भात आपल्याकडे सर्व पुरावे असून, लॉकडाऊन संपल्यानंतर नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन तक्रार करणार असल्याचेही सुनील महाजन यांनी सांगितले.शिवसेनेचे महानगरध्यक्ष शरद तायडे यांच्या संपर्क कार्यालयात घेतलेल्या पत्रकार परिषदेला नगरसेवक विष्णू भंगाळे व महानगरध्यक्ष शरद तायडे उपस्थित होते. या पुढे सुनील महाजन यांनी सांगितले की, निविदा न काढताच हा ठेका देण्यात आला आहे. शासनाने घालून दिलेल्याअटी-शर्तीचा भंग झाला आहे. सत्ताधाºयांनी मनपाच्या निधीचा गैरवापर केला आहे. एका बाजूला कोरोनाच्या औषधांसाठी टेंडरचा घोळ तर दुसºया बाजूला कोरोनाच्या नावाखाली विनाटेंडर आर्थिक लूट केली आहे. सुरुवातीला एस. के. कॉन्ट्रॅक्टरला ठेका देतांना बांधकाम विभागाला ९ मजूर पुरविण्याचा ठेका दिला होता. मात्र, त्यानंतर साफसफाईच्या ठेक्यासाठी प्रशासनाची कुठलीही मंजुरी नसतांना सफाईसाठी ४०० व वाहनचालक म्हणून २५० कामगार असे एकूण ६५० कामगार पुरविण्याचा मक्ता दिला असल्याचेही महाजन यांनी सांगितले. तसेच मक्तेदाराने ९५ टक्के बोगस हजेरी दाखविली असून, यामध्ये काही नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावाने बोगस हजेरी आढळून आल्या आहेत.या ठेक्यामध्ये कुठलाही भ्रष्ट्राचार झालेला नाही. तसेच हा ठेका नियमानुसार आहे. वॉटरग्रेसच्या तुलनेत या ठेक्यामध्ये जवळजवळ तीन कोटी रुपये वाचले आहेत. शहरात साफसफाईदेखील चांगली आहे. वॉटरग्रेसला पर्याय म्हणून तात्पुरत्या स्वरूपात या ठेका दिला आहे. या ठेका रितसर आहे की अनियमितता झाली आहे, हे प्रशासन बघेल.-भारती सोनवणे, महापौर.विरोधी पक्षनेते सुनील महाजन यांची नेमकी काय तक्रार आहे हे माहिती नाही, त्यांची तक्रार प्रशासनाकडे आली तर त्यावर चौकशी करता येईल.-सतीश कुलकर्णी, आयुक्त, जळगाव मनपा.सत्ताधाºयांचा आयुक्तांवर दबाव... विनानिविदा काढलेले एस. के. कॉन्ट्रॅक्टरचे टेंडर या पुढेही सुरू रहावे,यासाठी सत्ताधारी एका गटातर्फे आयुक्तांवर दबाव टाकण्यात येत असल्याचेही सुनिल महाजन यांनी सांगितले. या दबावातूनच मक्तेदाराने मनपाकडून प्रतिकामगार ५२० रूपये घेऊन महिला कामगारांना २०० रूपये व पुरूष कामगारांना २५० रूपये रोजदांरी देऊन उर्वरित रक्कमेचा गैरव्यवहार करत असल्याचा आरोपही महाजन यांनी केला. 

टॅग्स :Muncipal Corporationनगर पालिकाJalgaonजळगाव