शिवाजीनगरात नगरसेवकाच्या पत्नीला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:17 IST2021-01-03T04:17:49+5:302021-01-03T04:17:49+5:30

जळगाव : शौचालय व सेफ्टी टँक तोडण्याच्या वादातून नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या पत्नीला सातजणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना ...

Corporator's wife beaten in Shivajinagar | शिवाजीनगरात नगरसेवकाच्या पत्नीला मारहाण

शिवाजीनगरात नगरसेवकाच्या पत्नीला मारहाण

जळगाव : शौचालय व सेफ्टी टँक तोडण्याच्या वादातून नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांच्या पत्नीला सातजणांनी शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना शुक्रवारी, १ जानेवारीला रात्री ८ वाजण्याच्या सुमारास घडली. याप्रकरणी शनिवारी शहर पोलीस ठाण्यात सातजणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

शिवाजी नगरातील भुरे मामलेदार प्लॉट भागातील संतोष बाबुराव पवार व अतुल मच्छींद्र हराळ यांच्यात गट नं. ३४२/६ ब वरुन वाद आहेत. शिवाजी नगरातील प्रभाग क्रमांक २ चे नगरसेवक नवनाथ दारकुंडे यांनी मागील महिन्यात हा वाद मिटवला होता. त्यामध्ये रस्त्यातील शौचालय तोडून ५० हजार रुपये देण्याबाबत ठरले होते. शुक्रवारी दुपारी दोन वाजता दारकुंडे यांनी संतोष पवार यांना शौचालय टँक तोडण्यास सांगितले होते. त्यानंतर रात्री आठ वाजता दारकुंडे हे घरी नसताना संतोष बाबुराव पवार, राजू बाबुराव पवार, कलावती बाबुराव पवार, मनिषा राजू पवार, रोहिणी संतोष पवार, मनोहर अर्जुन पवार, लखन राजू पवार (सर्व रा. शिवाजीनगर, भुरे मामलेदार प्लॉट) हे त्यांच्या घरी गेले. यावेळी दारकुंडे यांची पत्नी जोत्स्ना यांना शिवीगाळ करून त्यांनी मारहाण केली तसेच झालेल्या झटापटीत संतोष पवार यांनी ज्योत्स्ना दारकुंडे यांच्या गळ्यातील सोन्याची दोन तोळ्याची मंगलपोत तोडून नुकसान केले आहे. ज्योत्स्ना यांच्या फिर्यादीवरून शहर पोलीस स्थानकात सातजणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा अधिक तपास संजय झाल्टे करत आहेत.

Web Title: Corporator's wife beaten in Shivajinagar