नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा

By Admin | Updated: February 12, 2017 00:37 IST2017-02-12T00:37:28+5:302017-02-12T00:37:28+5:30

भक्ती कॉप्लेक्समधील तळमजल्यातील गाळ्यांमध्ये बिअर बार सुरू करणे प्रस्तावित असून या दुकानास परवानगी दिल्यास आत्मदहनाचा इशारा भाजपाचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी दिला आहे.

Corporator's autobiography | नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा

नगरसेवकाचा आत्मदहनाचा इशारा

जळगाव : पोस्टल कॉलनी परिसरातील भक्ती कॉप्लेक्समधील तळमजल्यातील गाळ्यांमध्ये देशी, विदेशी व बिअर बार सुरू करणे प्रस्तावित असून या दुकानास परवानगी दिल्यास उपोषण व आत्मदहनाचा इशारा भाजपाचे नगरसेवक रवींद्र पाटील यांनी दिला आहे.
गिरणा टाकी परिसरातील पोस्टल कॉलनीत भक्ती कॉम्प्लेक्स मध्ये रिकाम्या असलेल्या तळमजल्यावरील गाळ्यांमध्ये बिअर बार व मद्य विक्रीचे  दुकान प्रस्तावित आहे.
याबाबत मनपाकडे ना हरकतसाठी अर्जही दाखल आहे. या भाग शैक्षणिक व धार्मिक म्हणून प्रसिद्ध आहे. परिसरात महाविद्यालय, शाळा जवळच पॉलिटेक्नीक, इंजिनिअरिंग कॉलेज आहे. त्यामुळे विद्यार्थी वर्ग खोली घेऊन याच भागात रहातो.
ही बाब गांभीर्याने घेऊन कॉम्प्लेक्समध्ये मद्य विक्री दुकानास परवानगी दिली जाऊ नये, अशी मागणी महापौर, जिल्हाधिकाºयांकडे रविंद्र पाटील यांनी केली असून याप्रश्नी भविष्यात उपोषण व आत्मदहनाचा ईशारा त्यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे.

Web Title: Corporator's autobiography