नगरसेवक सांभाळणे कठीण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:58+5:302021-06-22T04:12:58+5:30
नगरसेवक सांभाळणे कठीण पारोळा हे सध्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. कुठे स्वकीयांमधून टीकाटिपण्णी तर कुठे आपल्याच लोकांना सांभाळून ...

नगरसेवक सांभाळणे कठीण
नगरसेवक सांभाळणे कठीण
पारोळा हे सध्या राजकारणाचे केंद्रबिंदू ठरत आहे. कुठे स्वकीयांमधून टीकाटिपण्णी तर कुठे आपल्याच लोकांना सांभाळून घेण्यावरून राजकारण रंगू
लागले आहे. राजकारणात कार्यकर्ते सांभाळणे हे मोठेच दिव्य काम. हे काम फक्त कसलेला राजकारणी करू शकतो. कसलेला या अर्थाने त्याच्याजवळ ही कला तोच राजकारणी म्हणावा. दोन दिवसांपूर्वी पारोळ्यात विकास कामांचे भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळा झाला. एकाच पक्षाची नेते मंडळी व्यासपीठावर उपस्थित होती.
त्यामुळे कुठे चिमटा काढायचा आणि कुठे सोडायचा याबाबत ही मंडळी वाकबगार असते. अशा वेळी नेत्यांनी एकवेळ बायको सांभाळणे सोपे पण नगरसेवक सांभाळणे कठीण असल्याचे सांगताच हास्यकल्लोळ निर्माण झाला. नंतर कोण कोणाला सांभाळत आहे. यावरून उपस्थितांमध्ये खमंग चर्चा रंगली होती.
- चुडामण बोरसे