नगरसेवकाने स्वखर्चाने केले अस्वच्छ जागेचे सुशोभिकरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2018 19:28 IST2018-08-10T19:26:24+5:302018-08-10T19:28:13+5:30
अमळनेरात नागरिकांची झाली सोय

नगरसेवकाने स्वखर्चाने केले अस्वच्छ जागेचे सुशोभिकरण
अमळनेर, जि.जळगाव : प्रभाग क्रमांक पंधरामध्ये अस्वच्छ घाण जागेचे सुशोभिकरण करून महिला व नागरिकांसाठी बैठकीचा कट्टा स्वखर्चाने तयार करून दिला आहे.
प्रभाग १५ अ मधील त्रिमूर्ती नगरात असलेल्या मोठ्या वटवृक्षाची महिला पूजा करतात. मात्र त्याठिकाणी घाणीचे साम्राज्य होते. डुकरे चरत असत. ती जागा स्वच्छ करून सुशोभित करण्याची मागणी नागरिकांनी नगरसेवक प्रताप शिंपी यांच्याकडे केली. तेव्हा त्यांनी पालिकेकडे न जाता स्वखर्चाने त्याठिकाणी वटवृक्षाजवळ गोल पार बांधला. तसेच बसायला बाक ठेवून रंगरंगोटी केली. यामुळे महिलांसाठी पूजेची व्यवस्था झाली आहे. ज्येष्ठ व वृद्ध नागरिक यांच्यासाठी बैठक व गप्पांचा कट्टा तयार झाला, तर लहान मुलांसाठी खेळण्याची सुविधा झाली आहे. यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त करून नगरसेवक प्रताप शिंपी यांचे कौतुक केले.