प्लास्टिकचा वापर करणाऱ्या १९ दुकानदारांवर मनपाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2021 04:17 IST2021-03-10T04:17:29+5:302021-03-10T04:17:29+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरात ...

प्लास्टिकचा वापर करणाऱ्या १९ दुकानदारांवर मनपाची कारवाई
लोकमत न्यूज नेटवर्क
जळगाव : राज्य शासनाने प्लास्टिक व थर्माकोलचे उत्पादन व विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र, तरीही शहरात प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याने महापालिका प्रशासनाने गेल्या पाच दिवसांत शहरात प्लास्टिक उत्पादन व विक्री करणाऱ्यांविरोधात धडक मोहीम राबविली होती. यामध्ये शहरातील १९ दुकानदारांवर कारवाई करण्यात आली असून, त्यांच्याकडून ९१ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.
शहरात प्लास्टिकचा सर्रासपणे वापर होत असल्याच्या तक्रारी महापालिका प्रशासनाकडे प्राप्त झाल्या होत्या. यासह लोकशाही दिनातदेखील काही जणांनी तक्रारी केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत मनपा आरोग्य विभागाकडून ही कारवाई करण्यात आली असून, सहायक आयुक्त पवन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अमाेल सपकाळ, संजय बागूल, दिलीप बाविस्कर, राजेंद्र ठाकूर, माेहन जाधव, राजेश टिक्याव, शरद साेनवणे, लर्नी मार्टीन जाेसेफ यांच्या पथकाने २ ते ५ मार्चदरम्यान शहरातील १९ जणांवर कारवाई केली.
या दुकानदारांवर करण्यात आली कारवाई
नवीपेठेतील गिरीश टी कंपनी, सुभाष चाैकातील नेमीचंद प्रजापत, राज पॅकिंग, नीलेश ललवाणी, जगदीश माेहनलाल अहुजा, फुले मार्केटमधील प्रदीप जगवाणी, सदाेखचंद उच्धाणी, विजय तलरेजा, गुप्ताजी शेवभांडार, गुप्ता शेव मुरमुरे, नीलेश शाॅपी, सुमित नाराणी, ओम ट्रेडिंग, शिवा एम्पाेरियम, शीतल जैन, गाेलाणी मार्केटमधील पंकज आहुजा, जगदीश ओझा, शिवाजी भज्जेवाले, गीता हाेजीअरी यांना दंड करण्यात आला आहे.