मनपाचे संगणक, प्रिंटर चोरणारा संशयित अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 04:15 IST2021-04-06T04:15:53+5:302021-04-06T04:15:53+5:30

जळगाव : मनपाच्या लाठी शाळेतील कार्यालयातून संगणक, प्रिंटर, राऊटर असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणारा गणेश भास्कर सोनार (वय ...

Corporation computer, printer thief arrested | मनपाचे संगणक, प्रिंटर चोरणारा संशयित अटकेत

मनपाचे संगणक, प्रिंटर चोरणारा संशयित अटकेत

जळगाव : मनपाच्या लाठी शाळेतील कार्यालयातून संगणक, प्रिंटर, राऊटर असा ६९ हजार रुपयांचा मुद्देमाल चोरणारा गणेश भास्कर सोनार (वय २०, रा. लक्ष्मीनगर) याला एमआयडीसी पोलिसांनी सोमवारी अटक केली आहे.

६ जुलै २०२० रोजी ही चोरीची घटना घडली होती. एकूण सहा चोरट्यांनी ही चोरी केली होती. यातील दोघांना पूर्वीच अटक करण्यात आली आहे. दरम्यान, गुन्हा केल्यानंतर सोनार हा सुरत येथे पळून गेला होता. तो दोन दिवसांपूर्वीच जळगावात आल्याची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, आनंदसिंग पाटील, हेमंत कळसकर, चंद्रकांत पाटील, गफ्फार तडवी यांच्या पथकाने चिंचोली गावातून त्याला ताब्यात घेतले. सोनार याच्याविरुद्ध आणखी काही गुन्हे दाखल आहेत. मंगळवारी त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Web Title: Corporation computer, printer thief arrested