शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
4
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
5
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
6
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
7
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
8
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
9
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
10
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
11
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
12
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
13
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
14
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
15
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
16
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
17
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
18
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
19
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
20
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
Daily Top 2Weekly Top 5

coronavirus: भुसावळात चक्क महिलेच्या मृतदेहाची अदलाबदल, नातेवाईकांमध्ये संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2020 05:17 IST

मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

भुसावळ : शहरातील मुस्लीम कॉलनीतील निगेटिव्ह महिलेस कोरोना संशयित म्हणून तिचा मृतदेह सरळ कब्रस्तानमध्ये दफनविधीसाठी आणण्यात आला होता. मात्र शेवटची इच्छा म्हणून तिचा पाहिला असता चक्क मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे निदर्शनास आल्याने नातेवाईकांनी प्रशासनावर एकच संताप व्यक्त केला.मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे पाहून काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस प्रशासन व अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत, हा मृतदेह डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयात सुपूर्द करून मूळ मृतदेह ताब्यात घेत, त्याचे मुस्लीम रितीरिवाजानुसार दफन करण्यात आल्याने तणाव निवळला.रेल्वे रुग्णालयातून कोविड सेंटरला हलवलेयेथील मुस्लीम कॉलनीतील फातिमा समद पिंजारी या ६५ वर्षीय वृद्ध महिलेला तीन दिवसांपूर्वी भुसावळातील रेल्वे रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. मात्र तेथील डॉक्टरांनी या महिलेस डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालय-रुग्णालयातील कोविड सेंटरमध्ये हलविले. त्यानंतर ३ रोजी रात्री महिलेच्या नातेवाईकांना गोदावरी रुग्णालयातून ही महिला मृत झाल्याचे दूरध्वनीद्वारे कळवण्यात आले. ४ रोजी सकाळी महिलेचा मृतदेह ताब्यात घेऊन तो निगेटिव्ह अहवाल असल्याचे सांगत याचे शासकीय निकष पाळून रितीरिवाजानुसार दफन करण्याच्या सूचना तेथील अधिकाऱ्यांनी दिल्या. त्यानुसार महिलेच्या नातेवाईकांनी हा मृतदेह दफनभूमीत नेला. त्याठिकाणी मयत महिलेचा चेहरा उघडून पाहिला असता मृतदेहाची अदलाबदल झाल्याचे उघडकीस आले. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसJalgaonजळगाव