सकारात्मकता आणि स्वयंशिस्तीने कोरोना हरणार - डॉ.प्रदीप जोशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 5, 2020 16:35 IST2020-08-05T16:35:10+5:302020-08-05T16:35:23+5:30
सकारात्मकता आणि स्वयंशिस्तीने कोरोना हरवू शकतो, असा विश्वास जळगाव येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.

सकारात्मकता आणि स्वयंशिस्तीने कोरोना हरणार - डॉ.प्रदीप जोशी
भुसावळ : सकारात्मकता आणि स्वयंशिस्तीने कोरोना हरवू शकतो, असा विश्वास जळगाव येथील मानसोपचार तज्ज्ञ डॉ.प्रदीप जोशी यांनी व्यक्त केला आहे.
रोटरी क्लब आॅफ भुसावळ रेल सिटी आयोजित कोरोना भगाओ अभियाना अंतर्गत आयोजित आॅनलाईन व्याख्यानमालेत डॉ.प्रदीप जोशी यांचे ' कोरोना आणि मन:स्थिती ' या विषयावर व्याख्यान झाले. हे व्याख्यान झूम अॅप व फेसबूकवर पार पडले.
डॉ.जोशी यांनी कोरोनाची उत्पत्ती, सद्य:स्थिती आणि लय व त्याच्याशी निगडित आपली मानसिक अवस्था याचे विश्लेषण अतिशय सुंदर व सोप्या भाषेत उधृत केले.
प्रास्ताविक रोटरीचे अध्यक्ष संदीप जोशी यांनी केले. सचिव विशाल शाह यांनी आभार मानले. कार्यक्रम यशस्वितेसाठी प्रोजेक्ट चेअरमन डॉ.मकरंद चांदवडकर, डॉ.नितीन दावलभक्त व सर्व क्लब सदस्यांनी परिश्रम घेतले.