लोहारा येथून कोरोना झाला हद्दपार, पण...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2021 04:12 IST2021-06-22T04:12:02+5:302021-06-22T04:12:02+5:30
आज गाव कोरोनामुक्त आजच्या स्थितीला गावात एकही कोरोनाचा ॲक्टिव्ह रुग्ण गावात नाही. त्यामुळे गावाने कोरोनाला हद्दपार केल्याने एकीकडे गावकऱ्यांत ...

लोहारा येथून कोरोना झाला हद्दपार, पण...
आज गाव कोरोनामुक्त
आजच्या स्थितीला गावात एकही कोरोनाचा ॲक्टिव्ह रुग्ण गावात नाही. त्यामुळे गावाने कोरोनाला हद्दपार केल्याने एकीकडे गावकऱ्यांत समाधान दिसून येत असले तरी ज्या पद्धतीने गावकरी बेफिकिरीने वागताना दिसून येत आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा गावात कोरोनाचा शिरकाव झाल्यास नवल वाटायला नको.
सर्व काही पूर्वपदावर
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने येथे अक्षरशः थैमान घातले होते. नागरिकांमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. असे असतानाही आज मात्र येथील जनजीवन पूर्वीप्रमाणे सुरू झालेले आहे. कोणीही मास्क वापरताना दिसून येत नाही. तसेच सोशल डिस्टन्सिंगचे कोणीही पालन करताना दिसत नाही, तर अंत्ययात्रेत पुन्हा शेकडो लोक सहभागी होऊ लागले आहेत. त्यामुळे भविष्यात तिसऱ्या लाटेला यामुळे एक प्रकारे निमंत्रणच दिले जात आहे.