मराठी पत्रकारसंघातर्फे कोरोना यौद्ध्यांचा सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 6, 2020 04:17 IST2020-12-06T04:17:27+5:302020-12-06T04:17:27+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क जळगाव : कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार ...

Corona Warriors honored by Marathi Press Association | मराठी पत्रकारसंघातर्फे कोरोना यौद्ध्यांचा सन्मान

मराठी पत्रकारसंघातर्फे कोरोना यौद्ध्यांचा सन्मान

लोकमत न्यूज नेटवर्क

जळगाव : कोरोना काळात उत्कृष्ट सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचारी आणि पत्रकारांचा महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघातर्फे ४ डिसेंबरला आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान करण्यात आला. यात लोकमतचे कोल्हापूर येथील ज्येष्ठ पत्रकार समीर देशपांडे आणि जळगाव येथील पत्रकार आनंद सुरवाडे यांचा समावेश आहे.

पुणे येथील कोरोगाव पार्क येथील एका हॉटेलमध्ये कोरोनाचे सर्व नियम पाळून कमी उपस्थितीत हा सोहळा पार पडला. यावेळी पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ, आमदार रोहित पवार, उर्वरित महाराष्ट्र वैज्ञानिक विकास महामंडळाचे अध्यक्ष डॉ.योगेश जाधव, शेखर मुंदडा, पुरूषोत्तम लोहीया, पत्रकार संघाचे राज्य संघटक संजय भोकरे, कार्याध्यक्ष किरण आदींची व्यासपीठावर उपस्थिती होती. सन्मान देवदुतांचा, सन्मान सामाजिक जाणीवेचा याअंतर्गत २७ योद्धांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.

Web Title: Corona Warriors honored by Marathi Press Association