कोरोना योद्ध्यांचा भुसावळात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2020 15:36 IST2020-05-26T15:35:44+5:302020-05-26T15:36:48+5:30

लॉकडाऊन काळात झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.

Corona warriors honored in Bhusawal | कोरोना योद्ध्यांचा भुसावळात सन्मान

कोरोना योद्ध्यांचा भुसावळात सन्मान

ठळक मुद्देसखी श्रावणी महिला संस्था व जनमत प्रतिष्ठानचा उपक्रममानपत्र देवून केला सन्मान

भुसावळ, जि.जळगाव : लॉकडाऊन काळात झटणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा येथील सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्था भुसावळ व जनमत प्रतिष्ठान, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्याकरीता सुरू असलेल्या लॉकडाऊनसारख्या परिस्थितीत जीवाची पर्वा न करता सर्व लोकांनी आपल्या घरात सुखरूप राहावे यासाठी विविध रूपाने, विविध मार्गाने अहोरात्र झटणाºया या योद्ध्यांचे कौतुक करून आभार व्यक्त करावे या अनुषंगाने हा सत्कार करण्यात आला.
यामध्ये जीवाची पर्वा न करता २४ तास ड्युटी करणारे पोलीस व पेट्रोलचालक, पालिकेचे डॉक्टर, नगरसेवक, पत्रकार, साई सेवाचे कार्यकर्ते प्रवीण वारके, नगरसेवक पिंटू कोठारी, सोनी बारसे, नितीन धांडे, शिशिर जावळे, खा.खडसे यांचे सीएसआय पिंपळे यांना सन्मान पत्र देण्यात आले.
जनमत प्रतिष्ठान अध्यक्ष पंकज नाले व सखी श्रावणी महिला बहुउद्देशिय संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नेवे, उपाध्यक्षा माया चौधरी व हर्षाली पाटील आदी उपस्थित होते .
 

Web Title: Corona warriors honored in Bhusawal