शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषदेत कोरोना योद्धा महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांचा गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 9, 2021 20:47 IST

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्यसेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना ...

जळगाव : जागतिक महिला दिनानिमित्त महाराष्ट्र राज्य जि.प.बहुउद्देशीय आरोग्यसेवा कर्मचारी मध्यवर्ती संघटना व प्रतिभा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना काळात कार्यरत असलेल्या महिला अधिकारी-कर्मचाऱ्यांना कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले. हा कार्यक्रम जिल्हा परिषद येथे पार पडला.कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा रंजना पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.एन.पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी गणेश चौधरी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी कमलाकर रणदिवे, आरोग्य अधिकारी भीमाशंकर जमादार, सहायक प्रशासन अधिकारी व प्रतिभा फाउंडेशनच्या अध्यक्षा प्रतिभा सुर्वे, संघटनेच्या अध्यक्षा इंदिरा सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.यांचा झाला सन्मानयावेळी बालविकास प्रकल्प अधिकारी अर्चना अटाळे, कार्यालय अधीक्षक आबेदा तडवी, पर्यवेक्षिका जागृती तायडे, उर्दू शिक्षिका रजिया पठाण, प्राथमिक शिक्षिका ललिता पाटील, प्रयोग शाळा तंत्रज्ञ मेघा चौधरी. डाटा ऑपरेटर वैशाली भालेराव, आरोग्यसेविका चंद्रकला चव्हाण, आरोग्य सहायक आशा गजरे, अंगणवाडीसेविकास अनिता पाटील, कल्पना वायसे, अंगणवाडी मदतनीस प्रमिला पाटील, मदतनीस मीना सुळे, परिचर नंदा अवचर, आशा वर्कर शोभा बारेला, स्वच्छता कर्मचारी आशा महाजन आदींचा सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.जिल्हा परिषदेतील सेवा निवृत्त अधिकारी चंद्रकांत संत यांची नात समृद्धी हर्षल संत हिने दिल्ली परेडमध्ये देशातील एनसीसी मुलींच्या पथकाचे नेतृत्व केले, त्याबद्दल तिचा विशेष सन्मान करण्यात आला.यांनी घेतले परिश्रमसन्मान सोहळ्याचे प्रास्ताविक ग.स.सोसायटीच्या माजी संचालिका प्रतिभा सुर्वे यांनी, तर आभार शैलजा पाटील यांनी मानले, तसेच साळवा येथील उपशिक्षिका ज्योती राणे यांनी सूत्रसंचालन केले. यशस्वितेसाठी मंगेश बाविस्कर, अजय चौधरी, धनराज सोनवणे, संजय सूर्यवंशी, कल्पना चव्हाण, सरला पाटील, रेखा बडगुजर, रत्ना तायडे, रामेश्वर कुंभार, बळीराम सुर्यवंशी, भूषण तायडे, वसंत बैसाणे, माधुरी बेहेरे, छाया पाटील आदींसह संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

 

टॅग्स :Educationशिक्षणJalgaonजळगाव