सावखेडा येथे कोरोना लसीकरण शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2021 04:13 IST2021-07-21T04:13:07+5:302021-07-21T04:13:07+5:30

सावखेडा, ता. रावेर : येथील नवयुवक मंडळाच्या सहकार्याने व प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदाअंतर्गत १९ रोजी कोविशिल्ड ...

Corona vaccination camp at Savkheda | सावखेडा येथे कोरोना लसीकरण शिबिर

सावखेडा येथे कोरोना लसीकरण शिबिर

सावखेडा, ता. रावेर : येथील नवयुवक मंडळाच्या सहकार्याने व प्राथमिक आरोग्य केंद्र खिरोदाअंतर्गत १९ रोजी कोविशिल्ड लसीकरण जिल्हा परिषद शाळेत झाले. त्यात ११६ जणांना कोविशिल्ड लस देण्यात आली.

गावातीलच तरुण योगेश सैतवाल, संतोष नवले, किरण पाटील, सारंग पाटील, गोपाळ पाटील या नवयुवक मंडळींनी वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा करून गावातच लसीकरण शिबिर घडवून आणले.

यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी शिवराय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली खिरोदा प्राथमिक आरोग्य केंद्रात वैद्यकीय अधिकारी विजया झोपे, डॉ. आमिर तडवी, आरोग्यसेविका ज्योती इंगळे, आरोग्यसेवक हारुण काजी, आशावर्कर ममता महाजन, आशावर्कर रजनी नहाले, आशावर्कर प्रतिभा महाजन, आशावर्कर कविता कोळी, विलास साठे, किरण पाटील, सारंग पाटील, संतोष नवले, योगेश सैतवाल, गोपाल पाटील, संजय बखाल, रूपेश पाटील, चेतन पाटील, प्रमोद महाजन, रोहिदास महाजन, संजय बकाल, भूषण सोनवणे, किरण महाजन, सुरेश जैन यांनी सहकार्य केले.

Web Title: Corona vaccination camp at Savkheda