ममुराबाद येथे कोरोना नियंत्रणात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2021 04:15 IST2021-03-18T04:15:53+5:302021-03-18T04:15:53+5:30

ममुराबाद, ता. जळगाव : गावात गेल्या महिनाभरात १२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असले तरी त्यातील ८ रूग्ण कोरोनामुक्त ...

Corona under control at Mamurabad | ममुराबाद येथे कोरोना नियंत्रणात

ममुराबाद येथे कोरोना नियंत्रणात

ममुराबाद, ता. जळगाव : गावात गेल्या महिनाभरात १२ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले असले तरी त्यातील ८ रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. फक्त ४ रूग्णांवर सध्या शासकीय तंत्रनिकेतनमधील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत, अशी माहिती धामणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राकडून देण्यात आली.

ममुराबाद येथे गेल्या वर्षी १९ जून २०२० रोजी खंडेरावनगरात पहिला कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला होता. त्यानंतर विविध भागात सातत्याने रूग्ण वाढत गेले आणि कोरोना बाधितांची संख्या सुमारे ९५ पर्यंत जाऊन पोहोचली. दरम्यानच्या काळात अन्य आजाराने आधीच ग्रस्त असलेल्या सहा रुग्णांचा विविध ठिकाणच्या कोविड रुग्णालयात उपचार सुरू असताना दुर्दैवाने मृत्यू झाला. मात्र, आरोग्य यंत्रणा, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नाने व्यापक शोध व उपचार मोहीम राबविण्यात आल्याने वेळेवर उपचार मिळाल्यामुळे अनेक रुग्णांनी कोरोनावर नंतर मातसुद्धा केली होती. स्थानिक प्रशासनाकडून आवश्यक त्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर भर देण्यात आल्याने २८ सप्टेंबर २०२० पासून गावात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नव्हता. जनजीवन पूर्वपदावर आल्याने ग्रामस्थांनीही सुटकेचा निःश्वास सोडला होता. परंतु, महिनाभरात पुन्हा नव्याने १२ कोरोनाबाधित रूग्ण आढळल्यानंतर आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. बाधितांच्या संपर्कातील व्यक्तींची कोरोना चाचणी करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्रामपंचायतीकडुनही ग्रामस्थांमध्ये जनजागृती केली जात आहे.

Web Title: Corona under control at Mamurabad