कोरोना सोडेना भुसावळची पाठ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 2, 2020 23:06 IST2020-06-02T23:03:47+5:302020-06-02T23:06:18+5:30
कोरोना रुग्णांच्या संख्येत दररोज वाढ होत आहे.

कोरोना सोडेना भुसावळची पाठ
भुसावळ, जि.जळगाव : भुसावळ शहरात कोरोनाचा प्रकोप वाढतच असून दिवसागणिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येचा आलेख वर जात आहे.
२ रोजी प्राप्त अहवालानुसार भुसावळमध्ये १८ रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये सुंदरनगर, जुना सातारा, राम मंदिर वाड, पोलिस लाइन, वाल्मीक नगर या रुग्णांचा समावेश आहे.
याआधी भुसावळात नऊ पोलिसांना कोरोनाची लागण झाली असून, त्यातील एकाचा मृत्यू झालेला आहे.
भुसावळ शहरात कोरोनाने जवळपास सर्व परिसरामध्ये शिरकाव केला आहे. एकंदरीत, 'कोरोना सोडेना भुसावळकरांची पाठ' असे चित्र निर्माण झाले आहे.